---Advertisement---

रोव्हमन पॉवेलचा हा झेल पाहून मैदानावरील सर्वच थक्क! कोणाचाच विश्वास बसेना; पाहा VIDEO

---Advertisement---

वेस्ट इंडिजचा कर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रोव्हमन पॉवेल यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात एक अविश्वसनीय झेल घेतला. त्यानं बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला बाद करण्यासाठी समोरच्या दिशेला शानदार डाइव्ह मारत कॅच पकडली. त्याचा हा झेल पाहून मैदानातील सर्वच जण थक्क झाले होते.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात फाफ डू प्लेसिसनं ट्रेंट बोल्टला 5व्या षटकात मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु पॉवेलनं डीप मिड-विकेटवर कोणतीही चूक केली नाही आणि संघाला पहिलं यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पहिली विकेट पडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सावरता आलं नाही. यानंतर त्यांच्या ठराविक अंतरानं विकेट्स पडत गेल्या. फाफ डू प्लेसिस 14 चेंडूत 17 धावा करून बाद झाला.

 

ट्रेंट बोल्टनं आज पॉवरप्लेमध्येच त्याचं तिसरं षटक टाकलं. बोल्टनं कर्णधार संजू सॅमसनचा निर्णय योग्य ठरवला. फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली त्यांच्याविरुद्ध काहीच धावा करू शकले नाहीत. ट्रेंट बोल्टनं पॉवरप्लेमध्ये 3 षटकांत 6 धावा देऊन एक विकेट घेतली.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. बंगळुरूचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांच्यामध्ये पहिल्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी झाली. फाफ 14 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. विराट कोहलीनं 24 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 33 धावांची खेळी केली. यानंतर कॅमरून ग्रीन आणि रजत पाटीदार यांनी डावावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅमेरूनला 21 चेंडूत 27 धावाच करता आल्या. बंगळुरूचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल पुन्हा एकदा फ्लॉप झाला. तो खातं न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. राजस्थानकडून आवेश खाननं 3 आणि आर अश्विननं 2 विकेट घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

जे कोणीही करू शकलं नाही ते विराटनं करून दाखवलं! राजस्थानविरुद्ध लवकर आऊट होऊनही रचला इतिहास

आयपीएल सुरु होण्यापूर्वी संजू सॅमसननं बदलला मोबाईल नंबर, सगळ्यांशी बोलणंही केलं बंद; काय आहे कारण?

एलिमिनेटर सामन्यात आरसीबी टॉस हारली, राजस्थानची गोलंदाजी; जाणून घ्या प्लेइंग 11

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---