आयपीएल 2024चा हंगाम खरोखरच खूप रोमांचक राहिला. या हंगामात प्ले-ऑफचे उर्वरित 3 सामने बाकी आहेत. त्यापैकी एलिमिनेटर सामना आज (22 मे) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध राजस्थान राॅयल्स (RR) यांच्यामध्ये हा सामना खेळला जाणार आहे. यामध्ये जो संघ बाजी मारेल तो सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) येणाऱ्या (24 मे) रोजी क्वालीफायर 2 सामना खेळणार आहे. तत्पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे पूर्वीचे मालक विजय माल्ल्या यांचे एक ट्वीट समोर आले आहे. त्यामध्ये ते आरसीबी संघाचे अभिनंदन करत आहेत.
याआधी विजय माल्ल्या यांनी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध बंगळुरूनं मिळवलेल्या 27 धावांच्या विजयानंतर ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अभिनंदन करणारी पोस्ट केली होती. आता एलिमिनेटर सामन्याच्या दिवशी देखील माल्ल्या यांनी आरसीबीसाठी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांना आशा आहे की, बंगळुरू या हंगामात ट्राॅफी जिंकेल.
माल्यांनी ‘X’ वर लिहिलं, “जेव्हा मी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रेंचाइजी आणि विराटला खरेदी केलं होतं, त्यावेळी माझ्या मनानं मला सांगितलं होतं की, यापेक्षा चांगला निर्णय असूच शकत नाही. आतासुद्धा माझं मन मला सांगत आहे की, यंदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सर्वात मोठा दावेदार आहे.”
When I bid for the RCB franchise and I bid for Virat, my inner instinct told me that I could not have made better choices. My inner instinct tells me that RCB have the best chance to go for the IPL Trophy. Onward and Upward. Best of luck.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) May 21, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या हंगामात दमदार कामगिरी करत आहे. सलग 6 सामने जिंकून आरसीबीनं प्ले-ऑफचं तिकीट पक्कं केलं. पहिल्या टप्प्यात आरसीबीनं 8 सामन्यांपैकी 7 सामने गमावले होते. त्यामुळे प्ले-ऑफच्या आशा संपुष्टात आल्याचं वाटत होतं. मात्र बंगळुरूनं जोरदार कमबॅक केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याआधी 9 वेळा आयपीएल प्ले-ऑफमध्ये पोहचला आहे. बंगळुरूनं 3 वेळा फायनल सामना देखील खेळला आहे, मात्र एकदाही ट्राॅफी जिंकलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
केवळ 29 धावा करताच विराट कोहली रचणार इतिहास! आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा बनेल पहिलाच फलंदाज
मोठी बातमी! एलिमिनेटर सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका, आरसीबीनं रद्द केलं सराव सत्र