---Advertisement---

शाहरुख खानकडून भर मैदानात झाली चूक, रैना अन् आकाश चोप्राची हात जोडून मागितली माफी; पाहा व्हायरल VIDEO

---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली आहे. मंगळवारी, क्वालिफायर 1 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघानं सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला.

सामना संपल्यानंतर केकेआरच्या सर्व खेळाडूंनी मैदानावर जल्लोष केला. यावेळी संघाचा सहमालक आणि बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान देखील आपल्या मुलांसोबत विजयाचा आनंद साजरा करताना दिसला. केकेआरच्या दमदार विजयानंतर शाहरुख खाननं मुलगी सुहाना आणि लहान मुलगा अब्राहमसोबत स्टेडियमला ​​चक्कर मारली आणि चाहत्यांचं आभार मानलं. यादरम्यान शाहरुख खाननं क्रिकेट शोमध्ये व्यस्त असलेल्या आकाश चोप्रा, पार्थिव पटेल आणि सुरेश रैना यांना अचानक टक्कर मारली.

मैदानावर चक्कर मारत असताना शाहरुख खानचं लक्ष नव्हतं आणि तो टीव्ही शो मध्ये व्यस्त असलेल्या या माजी क्रिकेटपटूंच्या वाटेत आला. आपली चूक लक्षात आल्यानंतर शाहरुखनं थांबून तिघांनाही मिठी मारली आणि शेवटी हात जोडून त्यांची माफी मागितली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहते शाहरुखच्या या वागणुकीचं खूप कौतुक करत आहेत. सुरेश रैना आणि आकाश चोप्रा यांनीही सोशल मीडियावर या घटनेचा उल्लेख करत शाहरुख खानचं कौतुक केलं.

 

आयपीएल 2024 चा पहिला क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांच्यावरच उलटला. केकेआरनं हैदराबादला अवघ्या 159 धावांवर ऑलआउट केलं.

सलामीवीर ट्रॅव्हिस हेड खातं न उघडता बाद झाला. तर अभिषेक शर्मा 3 धावा करून तंबूत परतला. राहुल त्रिपाठीनं सर्वाधिक 55 धावांचं योगदान दिलं. हेनरिक क्लासेननं 32 आणि कर्णधार पॅट कमिन्सनं 30 धावांची खेळी केली. कोलकाताकडून मिचेल स्टार्कनं 4 षटकांत 34 धावा देत 3 बळी घेतले. धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून व्यंकटेश अय्यरनं नाबाद 51 आणि कर्णधार श्रेयस अय्यरनं नाबाद 58 धावा करत संघाला सोपा विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या – 

केवळ 29 धावा करताच विराट कोहली रचणार इतिहास! आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा बनेल पहिलाच फलंदाज

केकेआरची फायनलमध्ये धडक, पॅट कमिन्सच्या संघाचा दारुण पराभव

हैदराबादच्या एकतर्फी पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सची प्रतिक्रिया, म्हणाला, “आम्ही या पराभवाला…”

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---