---Advertisement---

टीम इंडियाचा हेड कोच निवडण्यात धोनीची भूमिका ठरणार महत्त्वाची! बीसीसीआयनं सोपवली मोठी जबाबदारी

On: मंगळवार, मे 21, 2024 12:46 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. बीसीसीआय राहुल द्रविडच्या जागी नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. या पदासाठी अनेक दावेदारांची नावं पुढे आली होती. मात्र अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही. आता यासंबंधीची मोठी माहिती समोर येत आहे.

वास्तविक, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक निवड प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविडच्या जागी मुख्य प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयची पसंत न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आहेत. परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली.

रिपोर्ट्सनुसार, आता स्टीफन फ्लेमिंग यांना पटवण्याची जबाबदारी महेंद्रसिंह धोनीवर आहे. स्टीफन फ्लेमिंगला पटवण्यात माही यशस्वी ठरला, तर ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होणार हे जवळपास निश्चित आहे. वास्तविक, स्टीफन फ्लेमिंग आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील बॉन्डिंग खूपच मजबूत मानलं जातं. दोघेही जवळपास 16 वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. स्टीफन फ्लेमिंग हे आयपीएल 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग होते. यानंतर, आयपीएल 2009 पूर्वी त्यांना चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक बनवलं गेलं. तेव्हापासून ते या पदावर आहेत.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जनं 5 वेळा आयपीएल जिंकलंय. टीमच्या या यशात स्टीफन फ्लेमिंगचा मोठा वाटा मानला जातो. त्यामुळेच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी बीसीसीआयची पहिली पसंती स्टीफन फ्लेमिंग आहे. मात्र ते सध्या चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त इतर अनेक संघांचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना भारतीय संघाचे प्रशिक्षक बनायचं नाही.

चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त स्टीफन फ्लेमिंग हे टेक्सास सुपर किंग्स, जोहान्सबर्ग सुपर किंग्स आणि सदर्न ब्रेव्हचे प्रशिक्षक आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर आता सगळ्यांच्या नजरा माहीवर आहेत. महेंद्रसिंह धोनी स्टीफन फ्लेमिंगला पटवण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा बीसीसीआयला आहे. तसं झाल्यास राहुल द्रविडच्या जागी स्टीफन फ्लेमिंग टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनतील हे निश्चित.

महत्त्वाच्या बातम्या – 

क्वालिफायर 1 सामन्यात पावसानं खेळ केला तर काय होणार? कोणता संघ अंतिम फेरीत पोहचणार? एका क्लिकवर जाणून घ्या

रोहित शर्माच्या आरोपांना ‘स्टार स्पोर्ट्स’नं दिलं उत्तर, निवेदन जारी करत म्हणाले…

कोलकाता की हैदराबाद, क्वालिफायर 1 मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीचा फायदा कोणत्या संघाला होणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---