---Advertisement---

जसप्रीत बुमराहच्या भन्नाट पुनरागमनाने आयसीसी टी20 क्रमवारीत भूकंप! टॉप 10 मध्ये एंट्री

On: गुरूवार, सप्टेंबर 17, 2026 10:32 AM
---Advertisement---

दिल्लीत खेळल्या जात असलेल्या अफगाणिस्तान विरुद्ध भारत टी२० मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळून झाले. यामध्ये भारताच्या फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोठी भुमिका बजावली, मात्र गोलंदाजही काही कमी नाही. फिटनेसच्या समस्येमुळे अनेक दिवस संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहने या मालिकेत शानदार कामगिरी केली आहे. त्याचा परिणाम आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दिसला आहे.

आयसीसीने बुधवारी (१६ सप्टेंबर) पुरुष संघांची आयसीसी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजाने मोठी झेप घेतली आहे. त्याने सात स्थानांची उडी घेत पहिल्या दहामध्ये स्थान काबीज केले आहे.

अनुभवी बुमराह मार्च महिन्यात खेळल्या गेलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाबाहेर होता. त्यामुळे त्याच्या आयसीसी क्रमवारीवर त्याच्या अनुपस्थितीचा परिणाम झाला होता. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी करत त्यामध्ये सुधारणा केली आहे.

ताज्या क्रमवारीनुसार, बुमराह आयसीसी टी२० गोलंदाजांच्या क्रमवारीत सात स्थानांनी पुढे येत दहाव्या स्थानी पोहोचला आहे. त्याचे ६५० रेटिंग आहेत. या यादीत रशीद खान पहिल्या स्थानी असून भारताच्या एका फिरकीपटूलाही दोन स्थानांचा फायदा झाला आहे. वरुण चक्रवर्तीला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो पाचव्या स्थानावर आला आहे.

अर्शदीप सिंगनेही ११ स्थानांची झेप घेत १४वे स्थान गाठले आहे. आयसीसी टी२० फलंदाजांची क्रमवारी पाहिली तर भारताचे तब्बल तीन खेळाडू पहिल्या दहामध्ये आहेत. पहिल्या दोनमध्ये तर टीम इंडियाचेच वर्चस्व आहे. इशान किशन पहिल्या, तर अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. तिलर वर्मा आठव्या स्थानावर आहे.

टी२० अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत झिम्बाब्वेचा सिकंदर रझा पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाबाहेर असलेल्या हार्दिक पंड्याला मात्र नुकसान झाले आहे. तो दोन स्थानांनी घसरून सातव्या स्थानावर आला आहे. पहिल्या दहामध्ये या यादीत भारताचा केवळ तो एकच खेळाडू आहे. (Jasprit Bumrah’s sensational comeback shakes up the ICC T20 rankings! Enters the top 10 IND vs AFG T20 Series)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---