---Advertisement---

गौतम गंभीरचा निवडकर्त्यांवर मोठा आरोप; म्हणाला, “मी पाया पडायचो नाही म्हणून…”

On: मंगळवार, मे 21, 2024 2:35 PM
Gautam-Gambhir
---Advertisement---

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर त्याच्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच तो टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर आपलं मत मांडत होता. यावेळी त्यानं त्याच्या कारकिर्दीतील संघर्षांबद्दल मोकळेपणानं सांगितलं.

गौतम गंभीरनं सांगितलं की, ज्युनियर लेव्हल टूर्नामेंटमध्ये त्याच्याशी कसा भेदभाव करण्यात आला. तो सांगतो की, जेव्हा तो मोठा होत होता, बहुधा 12 किंवा 13 वर्षांचा होता, तेव्हा त्यानं पहिल्यांदा 14 वर्षाखालील स्पर्धेसाठी प्रयत्न केला, परंतु त्याची निवड झाली नाही.

गौतम गंभीर पुढे सांगतो की, अंडर 14 स्पर्धेसाठी त्याची निवड झाली नाही, कारण तो निवडकर्त्यांच्या पाया पडला नाही. तेव्हापासून त्यानं वचन घेतलं की तो कधीही कोणाच्या पाया पडणार नाही आणि कोणालाही त्याच्या पाया पडू देणार नाही. गंभीर म्हणाला की, जेव्हा तो अयशस्वी झाला तेव्हा त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचाही उल्लेख केला जायचा. लोक त्याला टोमणे मारायचे.

गौतम गंभीर म्हणाला, “जेव्हा जेव्हा मी माझ्या कारकिर्दीत अपयशी ठरलो, मग ते अंडर 16 असो, अंडर 19 असो, रणजी ट्रॉफी असो किंवा माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात असो, लोक म्हणायचे की तू श्रीमंत कुटुंबातून येतो. तुला क्रिकेट खेळण्याची गरज नाही.”

42 वर्षीय गौतम गंभीर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या मेंटरची भूमिका बजावत आहे. या हंगामात त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकातानं चमकदार कामगिरी केली. केकेआरचा संघ 14 सामन्यांत 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

मंगळवारी (21 मे) पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्ससमोर सनरायझर्स हैदराबादचं आव्हान असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. याआधी कोलकाता नाईट रायडर्सनं दोन वेळा (2012, 2014) आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. दोन्ही वेळा गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

काय सांगता! यावर्षी हैदराबाद बनणार चॅम्पियन! आयपीएल 2016 अन् आयपीएल 2024 मध्ये ‘या’ गोष्टी आहेत समान

टीम इंडियाचा हेड कोच निवडण्यात धोनीची भूमिका ठरणार महत्त्वाची! बीसीसीआयनं सोपवली मोठी जबाबदारी

क्वालिफायर 1 सामन्यात पावसानं खेळ केला तर काय होणार? कोणता संघ अंतिम फेरीत पोहचणार? एका क्लिकवर जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---