---Advertisement---

हरभजन सिंग बनणार टीम इंडियाचा नवा हेड कोच? बीसीसीआयकडून मिळाली मोठी ऑफर!

On: मंगळवार, मे 21, 2024 3:32 PM
Harbhajan-Singh
---Advertisement---

राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक कोण असतील, याचा शोध सध्या सुरू आहे. दावेदारांच्या यादीत आतापर्यंत गौतम गंभीर, स्टीफन प्लेमिंग, रिकी पॉन्टिंग यांची नावं आली आहेत. दरम्यान, आता माजी फिरकीपटू हरभजन सिंगचं नावही समोर आले आहे. वृत्तानुसार, हरभजन सिंगला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर मिळाली आहे.

सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी20 विश्वचषकापर्यंत आहे. विश्वचषकानंतर टीम इंडियाला नवे प्रशिक्षक मिळतील. त्यासाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले आहेत. टीम इंडियाचा पुढचा मुख्य प्रशिक्षक विदेशी खेळाडू असण्याची शक्यता आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग बीसीसीआयच्या रडारवर आहेत. याशिवाय जस्टिन लँगरबद्दलही बातमी आली होती की, तेही या शर्यतीत आहेत. मात्र त्यांनी याला नकार दिलाय.

रिपोर्ट्सनुसार, हरभजन सिंग ही भूमिका साकारण्यासाठी तयार आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळाल्यास मी त्यासाठी तयार असल्याचं भज्जीनं सांगितलं. ‘एएनआय’शी बोलताना तो म्हणाला की, “मी अर्ज करेन की नाही हे माहित नाही. पण टीम इंडियाचं कोचिंग हे मॅन मॅनेजमेंटचे काम आहे. खेळाडूंना फक्त तेथे मॅनेज करावं लागेल. कव्हर ड्राइव्ह किंवा पुल शॉट कसा मारायचा हे कोणालाही शिकवावं लागत नाही. तसेच गोलंदाजाला गोलंदाजी कशी करायची हे तुम्हाला शिकवण्याची गरज नाही. याबद्दल सर्वांनाच माहित आहे. फक्त थोडंसं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. मला संधी मिळाली तर मी नक्की कोचिंग करेन. क्रिकेटनं मला सर्व काही दिलं आहे. अशा परिस्थितीत क्रिकेटला परत काही देण्याची संधी आली तर मी नक्कीच ते करेन.”

नुकतीच, भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, त्याच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडियाचा हेड कोच निवडण्यात धोनीची भूमिका ठरणार महत्त्वाची! बीसीसीआयनं सोपवली मोठी जबाबदारी

गौतम गंभीरचा निवडकर्त्यांवर मोठा आरोप; म्हणाला, “मी पाया पडायचो नाही म्हणून…”

‘या’ 5 कारणांमुळे ‘थाला’ची टीम आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहचू शकली नाही; जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---