IPLक्रिकेटटॉप बातम्या

क्रुणाल पांड्यामुळे जवळपास संपलं होतं आरसीबीच्या स्वप्निल सिंगचं करिअर! नेमकं काय घडलं? जाणून घ्या

भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पांड्या अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यानं भारतासाठी 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 130 धावांसह 5 विकेट्स घेतल्या आहेत. जरी तो भारतीय संघात आपलं स्थान पक्कं करू शकला नसला, तरी त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

क्रुणाल पांड्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये बडोदा संघाकडून खेळतो. काही वर्षांपूर्वी दीपक हुड्डाचं करिअर बरबाद केल्याच्या बातम्यांमुळे क्रुणालला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगच्या बाबतीतही असंच घडल्याचं समोर आलं आहे.

स्वप्नील सिंग हा 33 वर्षीय अष्टपैलू खेळाडू आहे, जो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा भाग राहिला. आयपीएल 2024 च्या लिलावात आरसीबीनं त्याला 20 लाख रुपयांना खरेदी केलं. विशेष म्हणजे, लखनऊनं स्वप्नील सिंगला 2023 मध्ये नेट बॉलर म्हणून साइन केलं होतं. मात्र ही भूमिका त्यानं अनिच्छेनंच स्वीकारली होती.

स्वप्नील सिंग म्हणाला, “मी 2016-2017 मध्ये बडोद्यासाठी दुलीप ट्रॉफीमध्ये खेळलो आणि संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. या दरम्यान मी भरपूर विकेट्सही घेतल्या. मी 2019 च्या देशांतर्गत सर्किटमध्ये कदाचित टॉप-2 किंवा टॉप-3 अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होतो. त्यानंतर कोविड-19 महामारी आली आणि कालांतरानं बडोदा संघाची निवड प्रक्रिया सुरू झाली. मला खात्री होती की, संघात मला निश्चितच स्थान मिळेल. मात्र मी जेव्हा बडोद्याचा कर्णधार क्रुणाल पांड्याला भेटायला गेलो, तेव्हा त्यानं सांगितलं की, तुझी संघात कोणतीही जागा नाही. मी त्याला विचारलं की, मी भारतातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तरीही मला संघात का घेतलं नाही? यावर क्रुणालनं, तुझ्या जागी एका तरुण खेळाडूला संधी दिल्याचं सांगितलं. मी परिस्थिती स्वीकारली आणि पुढे गेलो.”

स्वप्नील सिंग म्हणाला की, हे सर्व कदाचित त्याच्या भल्यासाठीच झालं असेल. स्वप्नील त्या हंगामात देशांतर्गत क्रिकेट खेळला नाही आणि तो नवीन राज्याकडून खेळण्याची संधी शोधायला लागला. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू इरफान पठाण त्याच्या मदतीसाठी पुढे आला. इरफान पठाणनं त्याला उत्तराखंडच्या संघात स्थान मिळवून दिलं. स्वप्नील म्हणतो की, तो बडोदा संघात राहिला असता तर त्याची कारकीर्द तिथेच संपली असती.

महत्त्वाच्या बातम्या –

शाहरुख खानकडून भर मैदानात झाली चूक, रैना अन् आकाश चोप्राची हात जोडून मागितली माफी; पाहा व्हायरल VIDEO

केवळ 29 धावा करताच विराट कोहली रचणार इतिहास! आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा बनेल पहिलाच फलंदाज

मोठी बातमी! एलिमिनेटर सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका, आरसीबीनं रद्द केलं सराव सत्र

Related Articles