---Advertisement---

एलिमिनेटर सामन्यात आरसीबी टॉस हारली, राजस्थानची गोलंदाजी; जाणून घ्या प्लेइंग 11

---Advertisement---

आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन

इम्पॅक्ट प्लेअर्स – स्वप्नील सिंग, अनुज रावत, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशक, हिमांशू शर्मा

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेअर्स – शुभम दुबे, डोनोवन फरेरा, नांद्रे बर्गर, शिमरॉन हेटमायर, तनुष कोटियन

हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-2 चे तिकीट पक्क करेल, जिथे त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर, आजचा सामना गमावणारा संघ स्पर्धेच्या बाहेर पडेल.

सलग 6 सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या आरसीबीवर मात करणं राजस्थानसाठी सोपं नसेल. एकेकाळी डू प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबी गुणतालिकेत 10व्या स्थानावर होती. परंतु तेथून चमत्कारिक कामगिरी करत संघ चौथ्या स्थानावर पोहोचला. बेंगळुरूनं शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीकडून आरसीबीला पुन्हा एकदा स्फोटक खेळीची अपेक्षा असेल. त्यानं आतापर्यंत 14 सामन्यात 708 धावा केल्या. तो ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे.

दुसरीकडे, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ विजयाचा मार्गापासून भरकटला आहे. सलग चार सामन्यांत पराभव झाल्यानंतर त्यांचा केकेआरविरुद्धचा शेवटचा साखळी सामना पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे त्यांना गुणतालिकेतील दुसरं स्थान गमवावं लागलं. तसेच संघाचा स्टार सलामीवीर जोस बटलर मायदेशी परतल्यामुळे त्यांची फलंदाजी कमकुवत झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

विराट कोहलीची प्ले-ऑफमधील आकडेवारी धक्कादायक! आरसीबीच्या चाहत्यांचा विश्वासच बसणार नाही

राजस्थानसमोर आरसीबीचा विजयी रथ रोखण्याचं आव्हान, कोणाचं पारडं जड? हेड टू हेड रेकॉर्ड काय? जाणून घ्या सर्वकाही

एलिमिनेटर सामन्यापूर्वी विजय माल्ल्यांचं आरसीबीसाठी खास ट्वीट, विराट कोहलीचं नाव घेऊन म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---