भारतीय क्रिकेट संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून रविवारपासून (२६ जून) उभय संघांना २ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. आगामी टी२० विश्वचषक २०२२च्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. या मालिकेच्या एक दिवस आधी भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्या याने पत्रकार परिषदेत मान्य केले आहे की, तो त्याच्यावर अधिक जबाबदारी आल्यास ती पूर्ण करण्यासाठी त्याचे सर्वोत्कृष्ट देतो. तसेच त्याने त्याच्या टिकाकारांनाही कडवे प्रत्युत्तर दिले आहे.
आयर्लंडविरुद्ध (Ireland vs India) डब्लिन येथे होणाऱ्या पहिल्या टी२० सामन्याच्या पूर्वसंध्येला हार्दिकने (Captain Hardik Pandya) पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान त्याला एक प्रश्न केला गेला की, आयर्लंड दौऱ्यानंतर तो भारतीय संघाचा कर्णधार राहणार नाही. कारण तेव्हा भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन होईल. म्हणून तू या दौऱ्यावर तुझ्यातील नेतृत्त्व क्षमतेला सिद्ध करू इच्छितोय का?
या प्रश्नाचे उत्तर देताना हार्दिक (Hardik Pandya Befitting Reply To Critics) म्हणाला की, “मी इथे कोणालाही काही दाखवायला आलेलो नाही. मला भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली आहे, जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी माझ्या प्रदर्शनाने संतुष्ट आहे. मला फक्त या मालिकेवर माझे पूर्ण ध्यान केंद्रित करायचे आहे. तसेच मी काय नवे करू शकतो, यासाठी मी प्रयत्नशील असेल.”
जबाबदाऱ्या स्विकारायला आवडतात
आयपीएल २०२२च्या हंगामात पहिल्यांदाच हार्दिकने गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्त्व करताना संघाला विजेतेपद मिळवून दिले. ज्यानंतर त्याला आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
या नव्या आणि मोठ्या जबाबदारीबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला की, “जर मी एखादी जबाबदारी घेत असेल आणि माझे निर्णय देत असेल, तर ते मजबूतच असतात. क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितींदरम्यान मजबूत बनून राहणे महत्त्वाचे असते. मला जेव्हाही नवीन जबाबदारी दिली गेली, तेव्हा मी तिला यशस्वीपणे सांभाळले आणि याचमुळे आज आणखी प्रगतशील बनलो आहे. भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना मी हेच पाहिल की, प्रत्येक खेळाडूला कशाप्रकारे ही जबाबदारी देऊ शकेल.”
💬💬 I have performed well when I have taken up responsibility: #TeamIndia Captain @hardikpandya7 👍#IREvIND pic.twitter.com/qOTX4P1myW
— BCCI (@BCCI) June 25, 2022
धोनी-विराटकडून बरेच काही शिकलो
पुढे बोलताना हार्दिकने एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्त्वाखाली आपण बऱ्याच गोष्टी शिकलो असल्याचे सांगितले आहे. “निश्चितपणे मी धोनी आणि विराटकडून खूप गोष्टी शिकलो आहे. परंतु सोबतच मी स्वत:ही माझे निर्णय घेत असतो. माझी खेळाची समज त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. पण हे मान्य करतो की, मी त्या दोघांपासून खूप काही शिकलो आहे,” असे हार्दिकने म्हटले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, कर्णधार रोहित शर्मा कोरोनाच्या विळख्यात
भारतातील पहिल्या ‘महिला’ क्रिकेट कोच, ज्यांनी ‘या’ भारतीय क्रिकेटरला शिकवली बॅट धरायला