---Advertisement---

उमरान, अर्शदीप की त्रिपाठी, पहिल्या टी२०त कोणाला खेळवणार? कर्णधार हार्दिकने दिली प्रतिक्रिया

On: रविवार, जून 26, 2022 9:12 AM
Hardik-Pandya-Bhuvneshwar-Kumar
---Advertisement---

अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांना २ टी२० सामने खेळायचे आहेत. या टी२० मालिकेची सुरुवात रविवारी (२६ जून) डब्लिन येथील पहिल्या टी२० सामन्याने होणार आहे. या सामन्यात पाहुण्या भारतीय संघाकडून काही अनकॅप्ड खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार हार्दिक पंड्या यानेही याबद्दल आपले मत मांडले आहे. तो सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलत होता.

कर्णधार हार्दिकने (Captain Hardik Pandya) पहिल्या टी२० सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत युवा खेळाडूंच्या पदार्पणाबद्दल बोलताना हार्दिक (Hardik Pandya On Young Players Debut) म्हणाला की, “आम्ही खेळाडूंना संधी देऊ इच्छित आहोत. परंतु आम्हाला आमची सर्वश्रेष्ठ प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरवायची आहे. अशात काही खेळाडूंना पदार्पणाची कॅप दिली जाऊ शकते. परंतु कोणताही निर्णय घेताना आम्ही आमची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन खेळवत आहोत, हे सुनिश्चित करू.”  

आयर्लंडविरुद्ध निवडल्या गेलेल्या भारतीय संघात आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेले ३ खेळाडू आहे. यामध्ये राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि उमरान मलिक (Umran Malik) यांचा समावेश आहे. अशात जर त्रिपाठीला पहिल्या टी२० सामन्यात खेळवायचे असेल, तर त्याला ऋतुराज गायकवाडच्या जागी इशान किशनसोबत सलामीला पाठवले जाऊ शकते. तर गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज आवेश खान याला विश्रांती देत उमरान मलिक किंवा अर्शदीप सिंग यांपैकी एकाला खेळवले जाऊ शकते.

https://twitter.com/BCCI/status/1540705753379483649?s=20&t=1p8U8De7VPyHQDRcZGjT3A

पुढे भारतीय संघाच्या बेंच स्ट्रेंथबद्दल हार्दिकने प्रतिक्रिया दिली. भारतीय संघ आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत त्यांच्या राखीव खेळाडूंना खेळवत आहे. अशात हार्दिकने भारतीय संघाकडे उपलब्ध असलेली बेंच स्ट्रेंथ संघासाठी चांगले संकेत आहेत, असे म्हटले आहे.

तो म्हणाला की, “जर अशी परिस्थिती ओढावली की आम्हाला एकाच वेळी २ संघ पाठवावे लागतील. तर आम्ही नशीबवान आहोत की, आमच्याकडे बेंच स्ट्रेंथ आहे. जेणेकरून आम्ही खेळाडूंना पाठवू शकतो आणि यामुळे बऱ्याच खेळाडूंना खेळण्याची संधीही मिळेल. भारतात लोकांकडे अफाट प्रतिभा आहे, परंतु अनेकांना संधी मिळत नाहीत. भारतीय संघाकडून खेळणे अनेकांचे मोठे स्वप्न असतो आणि त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरवणे खरोखरच शानदार असेल.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘मी इथे कोणाला काही दाखवायला आलो नाही’, कर्णधार हार्दिक पंड्याचे टिकाकारांना कडवे प्रत्युत्तर

भारतातील पहिल्या ‘महिला’ क्रिकेट कोच, ज्यांनी ‘या’ भारतीय क्रिकेटरला शिकवली बॅट धरायला

मराठमोळ्या स्मृती मंधानाचा श्रीलंकेतही ‘जबरा फॅन’, पेट्रोल नसताना स्टेडियममध्ये सामना बघायला लावली हजेरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---