कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी फलंदाज, गोलंदाजांबरोबर क्षेत्ररक्षकांनीही चांगले प्रदर्शन करणे तितकेच गरजेचे असते. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हा जितका चांगला फलंदाज आहे, तितकाच चांगला क्षेत्ररक्षकही आहे. त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा प्रत्यय दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यातील तिसऱ्या वनडे (Third ODI) सामन्यातही आला. न्यूलँड्स स्टेडियम, केपटाऊन येथे झालेल्या या सामन्यात त्याने झेल टिपण्याच्या विक्रमात न्यूझीलंडचे दिग्गज स्टिफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांना मागे सोडले आहे.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील आणि वनडे मालिकेतील या शेवटच्या सामन्यात पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजीला आला होता. ४९.५ षटके खेळताना २८७ धावा धावफलकावर लावत दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद झाला. या डावादरम्यान विराटने २ महत्त्वपूर्ण आणि अप्रतिम झेल (Virat Kohli’s 2 Catches) टिपले.
व्हिडिओ पाहा- आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे पाच T20 Opener
सर्वप्रथम त्याने डेविड मिलरचा झेल टिपत भारतीय गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला त्याची सामन्यातील पहिली विकेट मिळवून देण्यात हातभार लावला. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेचा खालच्या फळीतील फलंदाज केशव महाराजला विराटने झेलबाद केले. अशाप्रकारे त्याने या डावामध्ये एकूण २ झेल पकडले.
या सामन्यापूर्वी विराटच्या खात्यात १३२ झेलची नोंद होती आणि तो न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक फ्लेमिंग यांच्यापेक्षा एका झेलने मागे होता. मात्र तिसऱ्या सामन्यात २ झेल घेत तो फ्लेमिंगवर वरचढ ठरला आहे. आता विराटच्या खात्यात एकूण १३४ वनडे झेलची नोंद आहे. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणाऱ्या (Most Catches in ODI) क्षेत्ररक्षकांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाचा विक्रम श्रीलंकन दिग्गज माहेला जयवर्धनेच्या नावावर आहे. त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक २१८ झेल घेतले होते. त्यांच्यानंतर आजवर कोणताही क्षेत्ररक्षक ५० षटकांच्या क्रिकेट सामन्यात २०० झेलचा आकडा गाठू शकलेला नाही.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक
माहेला जयवर्धने – २१८ झेल
रिकी पॉटिंग – १६० झेल
मोहम्मद अझरुद्दीन – १५६ झेल
सचिन तेंदुलकर – १४० झेल
रॉस टेलर – १३९ झेल
विराट कोहली – १३४ झेल*
स्टिफन फ्लेमिंग – १३३ झेल
महत्त्वाच्या बातम्या-
Video: अर्धशतक ठोकल्यानंतर विराटने केले ‘डॅडी सेलिब्रेशन’, अनुष्कासह वामिकाच्या रिऍक्शनने जिंकली मने
“…म्हणून जेमिमा आणि शिखा विश्वचषक संघात नाहीत”; प्रशिक्षकांनी दिले स्पष्टीकरण
शास्त्री गुरूजी म्हणतायेत,”विराट आणखी दोन वर्षा नेतृत्व करू शकला असता”
हेही पाहा-