बुधवारी (दि. 07 डिसेंबर) बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. झेल घेताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर संघाला पराभूत होताना पाहून रोहित नवव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. त्याने यावेळी अर्धशतकही साकारले. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. यानंतर असे वृत्त आले की, रोहित तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेर पडला आहे. आता कसोटी मालिकेत त्याच्या खेळण्यावर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सचिव जय शाह?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी शुक्रवारी (दि. 09 डिसेंबर) यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. जय शाह यांनी म्हटले की, रोहितबद्दलचा निर्णय नंतर घेतला जाईल. ते निवेदनात म्हटले की, “बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याची तपासणी केली आहे. तसेच, ढाका येथील स्थानिक रुग्णालयात त्याचे स्कॅन करण्यात आले. तो तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्यासाठी मुंबईला रवाना झाला आहे. तसेच, तो शेवटच्या वनडे सामन्यात खेळणार नाही. कसोटी मालिकेत त्याच्या खेळण्याचा निर्णय नंतर घेतला जाईल.”
बीसीसीआयने दीपक चाहर आणि कुलदीप सेन यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाण्यास सांगितले आहे. दोघेही दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना जय शाह म्हणाले की, “वेगवान गोलंदाज कुलदीप सेन याने पहिल्या वनडेनंतर कमरेचे मांसपेशी ताणल्याची तक्रार केली होती. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तो पुढील मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. तसेच, वेगवान गोलंदाज दीपक चाहर याला दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती आणि तो मालिकेतून बाहेर झाला आहे. आता दोघेही एनसीएमध्ये जातील.”
भारताचा तिसरा वनडे सामना
भारतीय संघाचा 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना शनिवारी (दि. 10 डिसेंबर) चट्टोग्राम येथे बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. कारण, यापूर्वीचे दोन्ही सामने बांगलादेश संघाने आपल्या नावावर केले आहेत. अशात संपूर्ण मालिका गमवायची नसेल, तर भारताला तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवावा लागेल. (captain rohit Sharma availability for the test series will be decided later jai shah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तुम्ही या विजयाचे खरे हक्कदार आमदार जी’, पत्नीच्या विजयावर जडेजाकडून स्तुतीसुमने; पाहा ट्वीट
व्हिडिओ: ‘म्हातारा’ म्हणणाऱ्या कर्णधार बाबरला शादाब खानचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाला, ‘आता आम्ही’