दिल्ली | भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) पहिला टी20 सामना उद्या (3 नोव्हेंबर) दिल्लीत (Delhi T20) होणार आहे. यात रोहित शर्माला (Rohit Sharma) विराटचा विक्रम मोडण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू (Most runs in T20i) होण्यासाठी रोहितला केवळ 8 धावांची गरज आहे.
रोहितने टी20 कारकिर्दीत 98 सामन्यांत 32.14च्या सरासरीने 2443 धावा केल्या आहेत. तर या यादीत पहिल्या स्थानी असेलेल्या विराटने 72 सामन्यात 50च्या सरासरीने 2450 धावा केल्या आहेत.
या यादीत 79 सामन्यातील 2285 धावांसह न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील तिसऱ्या स्थानी आहे.
भारत आणि बांगलादेशमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका भारतात होत आहे. यात भारताचे नेतृत्त्व रोहितकडे सोपविण्यात आले आहे.
विराट कोहलीला (Virat Kohli) क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे विश्रांती देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
2450- विराट कोहली, सामने- 72
2443- रोहित शर्मा, सामने- 98
2285- मार्टिन गप्टील, सामने- 79






