भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठ-मोठ्या षटाकारांसाठी ओळखला जातो. रोहित शर्माला (Rohit Sharma) हिटमॅन नावाने सुद्धा ओळखले जाते जोपर्यंत रोहित खेळपट्टीवर आहे. तोपर्यंत तो धावांची गती कमी होऊ देत नाही. याचं कारण हे आहे की, तो षटकार मारण्यासाठी नेहमी सज्ज असतो. रोहितच्या नावावर अनेक रेकाॅर्ड्स आहेत. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणार खेळाडू आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 300 पेक्षा जास्त षटकार आहेत.
आता कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू होण्याची संधी आहे. रोहितनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 331 षटकार मारले आहेत. तो ख्रिस गेलसहित दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर शाहिद आफ्रिदी आहे. त्याचं रेकाॅर्ड मोडीत काढण्यासाठी रोहितला 21 षटकारांची गरज आहे.
आता आपण जाणून घेऊया रोहितनं कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. त्यामध्ये पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितनं 132 षटकार ठोकले आहेत. ऑस्ट्रेलिया असा एकमेव संघ आहे ज्यांच्याविरुद्ध रोहितनं 100 पेक्षा जास्त षटकार मारले आहेत. दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडीज संघ आहे. त्यांच्याविरुद्ध रोहित 88 षटकार मारले आहेत, तर श्रीलंकेविरुद्ध त्यानं 86 षटकार मारले आहेत.
रोहित शर्मानं (Rohit Sharma) 59 कसोटी आंतरराष्ट्रीय सामन्यात 84 षटकार मारले आहेत. तर 265 एकदिवसीय सामन्यात 331 षटकार मारले आहेत आणि 159 टी20 सामन्यात त्यानं 205 षटकार लगावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीचं ठरलं! ‘या’ मालिकेतून टीम इंडियात करणार पुनरागमन
जितेश शर्माने उरकला साखरपुडा, पंजाब किंग्जच्या ‘फॅन गर्ल’ला बनवणार जीवनसंगिनी
संजू सॅमसनचा मोठा निर्णय! ‘या’ स्पर्धेमध्ये नाही खेळणार, मोठे कारण समोर