आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy 2024-25) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. तत्पूर्वी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी आज (18 जानेवारी) रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरताना दिसणार आहे.
2024-25च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) भारतीय संघाच्या पराभवानंतर बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंसाठी काही नवीन नियम बनवले. हे नवीन नियम 10 मुद्द्यांमध्ये विभागले गेले होते, ज्यामध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळणे आणि खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासह दौऱ्यावर न जाणे हे नियमदेखील समाविष्ट होते. दरम्यान आता भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) या नियमांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
शनिवारी (18 जानेवारी) भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) पत्रकार परिषदेत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. संघाची घोषणा झाल्यानंतर रोहित आणि मुख्य निवडकर्त्यांसोबत अनेक प्रश्नोत्तरे झाली. यावेळी बीसीसीआयच्या नवीन नियमांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
रोहित शर्माला बीसीसीआयच्या नवीन धोरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “तुम्हाला हे नियम कोणी सांगितले? ते बीसीसीआयच्या अधिकृत हँडलवरून आले आहेत का? त्यांना अधिकृतपणे येऊ द्या.” याशिवाय, अजित आगरकर यांनी बीसीसीआयच्या नवीन नियमांवर बोलताना म्हटले की, “प्रत्येक संघाचे काही नियम असतात आणि तुम्ही खेळताना नियमांचे पालन करता. ही शाळा नाही. ही शिक्षा नाही. तुम्ही स्वाभाविकपणे काही गोष्टींचे पालन करता. चला ते असे करूया जसे प्रत्येक संघाला तेच असते. त्यापैकी बरेच जण अजूनही जागेवर आहेत आणि तुम्ही पुढे जाताना ते सुधारत राहता.”
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा
महत्त्वाच्या बातम्या-
752 ची सरासरी, तरीही दुर्लक्ष! करुण नायरच्या हाती पुन्हा एकदा निराशा
हॅरी ब्रूक, जयस्वालसह हे चार फलंदाज ‘फॅब-4’ ची पुढील पिढी, माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा