फिटनेस हा सामान्यांपासून खेळाडूंपर्यंत सर्वांसाठीच महत्त्वाचा असतो. अनेकदा लठ्ठ व्यक्तींना ट्रोल केले जाते, ज्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचाही समावेश आहे. मात्र, भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक अंकित कलियार यांचे मत जरा वेगळे आहे. त्यांनी म्हटले की, रोहित हा विराट कोहली याच्याप्रमाणेच फिट आहे. त्यासोबतच त्यांनी रोहितची गणना जगातील सर्वात फिट क्रिकेटपटूंमध्ये केली आहे.
खरं तर, भारतीय संघाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा दिसायला जरी जाड असला, तरीही जेव्हा फिटनेसचा विषय असतो, तेव्हा तो प्रत्येक टेस्टमध्ये पास होतो. आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेपूर्वी भारतीय संघाची यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) झाली होती, ज्यात सर्व खेळाडूंनी भाग घेतला होता. यामध्ये रोहित शर्माही सहजरीत्या पास झाला होता.
भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक अंकित कलियार (Strength and Conditioning Coach Ankit Kaliyar) यांनी रोहित शर्माचा फिटनेस (Rohit Shama Fitness) कसा आहे, याविषयी माध्यमांशी बोलताना सविस्तर सांगितले. ते म्हणाले की, “रोहित शर्मा एक फिट खेळाडू आहे. त्याचा फिटनेस चांगला आहे. तो थोडा जाड दिसतो, पण तो नेहमीच यो-यो टेस्टमध्ये पास होतो. तो विराट कोहलीसारखाच फिट आहे. असे वाटते की, तो जाड आहे, पण आपण त्याला मैदानावर पाहिले आहे. त्याची चपळता आणि गतिशीलता अद्भूत आहे. तो सर्वात फिट क्रिकेटपटूंपैकी एक आहे.”
मात्र, एका मुलाखतीदरम्यान जेव्हा त्यांना विचारले गेले की, सध्याच्या भारतीय क्रिकेट संघातील कोणता खेळाडू शारीरिकरीत्या सर्वात जास्त फिट आहे आणि का? याचे उत्तर देताना त्यांनी विराट कोहली याचे नाव घेतले.
अंकित कलियार (Ankit Kaliyar) म्हणाले की, “विराट कोहली भारतीय संघ आणि जगातील सर्वात फिट खेळाडू आहे. यामागे असे कारण आहे की, तो एक कठोर वेळापत्रकाचे पालन करत आहे. खेळत असो किंवा नाही, तो त्याचे न्यूट्रीशन, ट्रेनिंग, सप्लिमेंट आणि कंडीशनिंग भागाचा वास्तवात चांगल्याप्रकारे पालन करत आहे किंवा त्याची काळजी घेत आहे. तो आपली शिस्त आणि दिनचर्येविषयी खूपच धार्मिक आहे. तो भारत आणि जगातील सर्वात फिट खेळाडू आहे.”
कसोटीत खेळणार रोहित-विराट
रोहित शर्मा आणि विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहेत. कसोटीपूर्वी 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांच्या मालिका खेळल्या जाणार आहेत. या दोन्ही मालिकांमधून रोहित आणि विराटला विश्रांती दिली आहे. अशात या दोन्ही खेळाडूंना खेळताना पाहण्यासाठी चाहते खूपच आतुर झाले आहेत. (captain rohit sharma is bulky but he is as fit as virat kohli india strength and conditioning coach ankit kaliyar)
हेही वाचा-
पाकिस्तानची इज्जत चव्हाट्यावर! सीनियर टीम डॉक्टराशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, तर ज्युनियर टीम मॅनेजरशिवाय यूएईत
‘मी कधीच ते पिण्याचा प्रयत्न केला नाही…’, गौतम गंभीरचा ‘त्या’ गोष्टीविषयी मोठा खुलासा