टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर संपूर्ण देश जल्लोषात बुडाला आहे. रात्री उशिरा पर्यंत लोक तिरंगा ध्वज घेऊन रस्त्यावर जमले आणि फटाके फोडू लागले. सामना संपल्यानंतर रात्री देशातील अनेक शहरांमध्ये असेच दृश्य पाहायला मिळाले. तसेच या विजयानंतर भारतीय खेळाडूंना देखील आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांनी मैदानावर जल्लोष साजरा केला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आश्चर्यकारक कामगिरी करत 2007 नंतर टी-20 विश्वचषक जिंकली. सामना जिंकल्यानंतर रोहितने सर्व खेळाडूंना मिठी मारली. तो स्वतः रडत होता. रोहित पुन्हा पुन्हा कोहलीला मिठी मारत होता. कोहलीला मिठी मारताना तो रडतानाही दिसला.
भारताच्या विजयानंतर रोहितच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते. त्याने सामन्याचा नायक हार्दिक पांड्याला मिठी मारली आणि त्याचे किस घेतले. सामना संपल्यानंतर हार्दिक तिरंगा झेंडा घेऊन स्टार स्पोर्ट्सला भावनिक मुलाखत देत असताना हे दृश्य दिसले. विजयाच्या आनंदात कर्णधार रोहित शर्माही तेथे पोहोचला आणि त्याने हार्दिकला मिठी मारली आणि त्याच्या गालाचे किस घेतले असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हिटमॅन हार्दिक पांड्याला किस करताना दिसत आहे.
#Hardik in tears of Explaining what he gone through for the past 6 months..#Rohit Comes and Gave a Hug & Kiss to him 😭😭😭😭💙 pic.twitter.com/8IUe8rS3Dt
— Mumbai Indians TN (@MumbaiIndiansTN) June 29, 2024
भारताच्या विजयाचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे हार्दिक पांड्याने हेनरिक क्लासेनला बाद केले. तो 27 चेंडूत 52 धावा करून खेळत होता. हार्दिकने क्लासेनला रिषभ पंतकडे विकेटच्या मागे झेलबाद केले. यानंतर भारतीय संघ सामन्यामध्ये जोरदार कमबॅक करत सामना 7 धावांनी रोमहर्षक विडय मिळवला.
महत्तवाच्या बातम्या-
रोहित- कोहलीचा प्लॅन यशस्वी, टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविडचं भन्नाट रुप समोर
वर्ल्डकप जिंकल्यानंतर पत्नीनं घेतली मुलाखत पण बुमराहला शब्द फुटेना, पाहा मैदानावरील व्हिडिओ
3 खेळाडू जे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे कर्णधार बनू शकतात