IND vs AFG 2nd T20I : अफगाणिस्तान विरूद्धची 3 सामन्यांची टी-20 मालिका भारताने इंदोरचा सामना जिंकत आपल्या नावे केली. पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने विजयी आघाडी मिळवली. रविवार(14 जानेवारी) होळकर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तान संघाचा 26 चेंडू राखून पराभव केला.
रोहितच्या नावे एक खास विक्रम
हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) फारच खास होता. रोहित 150 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा इतिहासातील पहिला पुरूष खेळाडू ठरला. त्याने 2007 साली आपले पदार्पण केले होते. सामना खास असला तरी, भारतीय कर्णधाराची सामन्यातील कामगिरी मात्र निराशाजनक ठरली. तो आपल्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. रोहित आपल्या कामगिरीवर निराश जरी असला तरी, ती जास्त काळ टिकली नाही. सामन्यानंतर तो आपल्या संघावर चांगलाच खूश होता. प्रजेंटेशन सेरेमनीमध्ये त्याने स्वत:चे करियर आणि युवा खेळाडूंच्या कामगिरीवर बऱ्याच गोष्टी बोलला. (Rohit Sharma joins Allan Border in elusive two-man feat as India captain makes record T20I appearance vs AFG in Indore)
Milestone 🚨 – @ImRo45 is all set to play his 150th match in the shortest format of the game.
Go well, Skip 🫡#TeamIndia pic.twitter.com/1uWje5YNiq
— BCCI (@BCCI) January 14, 2024
आमची भूमिका आणि टार्गेट स्पष्ट आहे
रोहित सामन्यानंतर म्हणाला, “हा एक शानदार अनुभव आहे. 2007 पासूनचा हा प्रवास खूपच खास आहे. माझ्या मते, आजच्या सामन्यात आम्हाला काय हवंय हे संघाला चांगलेच ठाउक होते. अशी कामगिरी पाहून संघाचा अभिमान वाटतो.’
शिवम दुबे आणि यशस्वी जयसवालचे केले भरभरून कौतूक
“यशस्वी जयसवाल आणि शिवम दुबे या दोघांनीही मागील 1-2 वर्षांपासून एकदम चांगली कामगिरी केली आहे. यशस्वी तर भारतीय संघाकडून वर्षभरापासून टेस्ट आणि टी-20 सामने खेळत आहे. भेटलेल्या संधींचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला आहे. शिवम देखील तेच करत आहे. तो एक मजबूत खेळाडू असून, स्पिनर्सची तो दैना उडवू शकतो.” (IND vs AFG, 2nd T20I highlights: Jaiswal, Dube, bowlers help India seal series against Afghanistan)
महत्वाच्या बातमा –
अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच रोहितने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू
“पुजारा-रहाणेची कसोटी कारकीर्द संपली”, दिग्गज फलंदाजांबाबत माजी खेळाडूचं मोठं विधान