---Advertisement---

अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच रोहितने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू

rohit sharma
---Advertisement---

IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला रेला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितसाठी हा सामना खूप खास होता. कारण, हा त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 150 वा सामना होता.

रोहित शर्मा (Rohit Sharma) व्यतिरिक्त कोणताही खेळाडू टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 सामने खेळू शकलेला नाही. अशा परिस्थितीत ही खास कामगिरी करणारा हिटमॅन हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. रोहितनंतर पॉल स्टर्लिंग (Paul Sterling) याचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या आयरिश क्रिकेटपटूने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 134 सामने खेळले. तर जॉर्ज डॉकरेल (George Dockrell) याचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये 128 सामने खेळले. या यादीत पाकिस्तानचा महान फलंदाज शोएब मलिक (Shoaib Malik) याचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 124 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. न्यूझीलंडचा दिग्गज मार्टिन गुप्टिल ( Martin Guptill) याचे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 122 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (ind vs afg rohit sharma become first player complete 150 t20i international)

भारतीय संघाचा हा दिग्गज फलंदाज पहिल्या सामन्यात धावबाद झाल्याने त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. तर दुसऱ्या सामन्यातही त्याला खातं उघडता आलं नाही. रोहित भारतासाठी मॅच-विनिंग खेळाडू आहे. तो भारतीय संघाला प्रत्येक सामन्यात जबरदस्त सुरूवात करून देत असतो. परंतु या सामन्यात शून्यावर बाद झाल्यामुळे त्याला हा सामना अविस्मरनिय बनवता आला नाही. रोहितने आतापर्यंत 150 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्याने 30.82 च्या सरासरीने 3853 धावा केल्या आहेत. 118 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. (As soon as he stepped on the field against Afghanistan Rohit created history, becoming the first cricketer in the world to do so)

हेही वाचा

“पुजारा-रहाणेची कसोटी कारकीर्द संपली”, दिग्गज फलंदाजांबाबत माजी खेळाडूचं मोठं विधान
IND vs AFG । होळकर स्टेडियमवर जयस्वालचा धमाका आणि दुबेचं वादळ! टी-20 मालिका भारताच्या खिशात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---