इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्याने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मात्र, भारतीय संघाचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना अजूनही वाट पाहावी लागणार आहे. भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या चेपॉक मैदानात ऑस्ट्रेलियाशी दोन हात करेल. विशेष म्हणजे, स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी बुधवारी (दि. 04 ऑक्टोबर) आयसीसीने ‘कॅप्टन्स डे’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान 10 संघांच्या कर्णधारांनी भाग घेतला. यावेळी एका पत्रकाराच्या प्रश्नावर रोहित शर्मा याची रिऍक्शन जोरदार व्हायरल होत आहे.
पत्रकाराचा प्रश्न आणि रोहितची रिऍक्शन
‘कॅप्टन्स डे’ (Captains Day) या कार्यक्रमात रोहित शर्मा (Rohit Sharma) याला एका पत्रकाराने प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता की, “मागील विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये खेळला गेला. हा सामना बरोबरीत सुटला आणि त्यानंतर सुपर ओव्हर झाली. तीदेखील बरोबरीत सुटली. त्यानंतर इंग्लंडला विजेता घोषित केले गेले. यावेळी दोन्ही संघांना विजयी घोषित केले जाऊ शकत होते. याबाबत तुम्ही काय म्हणाल?”
Jos Buttler asking for the translation to Babar Azam for Rohit Sharma's joke in Hindi. pic.twitter.com/vZMl5bPcUS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 4, 2023
या प्रश्नावर रोहित नाराजही दिसला. त्याने यावेळी अशी काही रिऍक्शन दिली की, ज्यावर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि इतर कर्णधारही हसू लागले. रोहित म्हणाला की, “हे काय आहे यार? हे माझे काम नाही सर. घोषित करणे माझे काम नाही.”
https://twitter.com/Rainbowsalts91/status/1709504967785291991?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1709504967785291991%7Ctwgr%5E4dddfa9d0ca9dd34106826759e0036da488f00cf%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fsports%2Fcricket%2Frohit-sharma-stuns-reporter-with-his-reply-on-captains-day-video-went-viral-2023-10-04-992519
भारत-पाकिस्तान सामना
विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने आहेत. तसेच, भारत आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. मात्र, भारताचा महामुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. खरं तर, पाकिस्तान संघ विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाला कधीही पराभूत करू शकला नाहीये. या दोन्ही संघांनी विश्वचषकात 7 वेळा एकमेकांचा सामना केला आहे. यामध्ये प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला आहे. आता 14 ऑक्टोबर रोजी भारत पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (captain rohit sharma stuns reporter with his reply on captains day video went viral 2023 )
हेही वाचा-
वर्ल्डकपमध्ये वाढल्या ऑस्ट्रेलियाच्या अडचणी! दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू घेऊ शकतो माघार
बोल्टने पहिल्याच सामन्यात केला विक्रम! आतापर्यंत जगात फक्त 2 गोलंदाजांना जमलेली ‘ही’ कामगिरी