रविवारी (दि. 26 मार्च) दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळण्यात आला. सेंच्युरियन येथे खेळण्यात आलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 विकेट्सने पराभूत व्हावे लागले. वेस्ट इंडिजने सामना गमावला असला, तरीही त्यांचा कर्णधार रोवमन पॉवेल याने एका कृतीने सर्वांची मने जिंकली. यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
खरं तर, वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार रोवमन पॉवेल (Rovman Powell) सीमारेषेवर उभ्या असलेल्या एका 5 वर्षीय बॉल-बॉयला वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झाला. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील उमटत आहेत.
मुलाला वाचवण्यासाठी स्वत: जखमी झाला पॉवेल
खरं तर, ही घटना दक्षिण आफ्रिका संघाच्या डावातील पाचव्या चेंडूवर घडली. यावेळी क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याने मिड ऑफ सीमारेषेच्या दिशेने फटका मारला. यावेळी चेंडू पकडण्यासाठी वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेल धावला. मात्र, चेंडू सीमारेषेच्या जवळ पोहोचताच, त्याने निर्णय बदलला. कारण, तिथे 5 वर्षांचा बॉल-बॉय ( 5 years old ball-boy) चेंडू उचलण्याचा प्रयत्न करत होता. पॉवेल डाईव्ह मारून चेंडू रोखू शकत होता, परंतु त्याने असे केले नाही. यावेळी त्याचा वेग इतका जोरात होता की, तो स्वत:ला रोखू शकला नाही आणि सीमारेषेच्या पलीकडील एलईडी बोर्डाला धडकून स्वत: जखमी (Rovman Powell Injured Himself) झाला. फिजिओने त्याला यावेळी तपासले. मात्र, त्याला गंभीर जखम झाली नव्हती. त्यामुळे त्याने क्षेत्ररक्षण करणे सुरूच ठेवले.
SPIRIT OF CRICKET – Rovman Powell puts his body on the line and nearly injures himself instead of crashing into two little ball boys. Top humanitarian effort by the WI Captain! pic.twitter.com/KNNWcR5Jpg
— Israr Ahmed Hashmi (@IamIsrarHashmi) March 26, 2023
आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशात आता चाहते पॉवेलला ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’चा पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत. यासोबतच क्रिकेट दक्षिण आफ्रिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण, साधारणत: इतक्या कमी वयाच्या मुलाला बॉल-बॉय म्हणून वापरले नाही पाहिजे. अशावेळी अनेकदा दुखापतग्रस्त होण्याचा धोका असतो.
सामन्याबाबत बोलायचं झालं, तर वेस्ट इंडिजने जॉनसन चार्ल्स (Johnson Charles) याच्या 118 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर 5 विकेट्स गमावत 258 धावा केल्या होत्या. चार्ल्सने त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 11 षटकार खेचले. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट्स गमावत 7 चेंडू शिल्लक ठेऊन सामना जिंकला. यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक याने 44 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 100 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना 28 मार्च रोजी जोहान्सबर्ग येथे खेळला जाईल. सध्या दोन्ही संघ 1-1अशा बरोबरीत आहेत. (captain rovman powell injured himself while saving 5 year old ball boy during wi vs sa 2nd t20i match see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकच मारला पण कच्चून मारला! फलंदाजाने स्टेडिअमबाहेर चेंडू मारत नसीमला दाखवल्या चांदण्या, व्हिडिओ व्हायरल
‘धोनीसारखी क्रेझ इतर कोणत्याही क्रिकेटपटूला नाही’, वर्कआऊट करताना पाहून फॅन्सचा जिमबाहेर राडा