चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. त्यापैकी पहिल्या दोन सामन्यात दणदणीत विजय संपादित केलाय, तर मागील सलग दोन सामन्यात धक्कादायक पराभव संघाला पाहावा लागला आहे. दोन सामने हरले असले तरीही सीएसकेचे स्थान सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. परंतू सुपर फॉर्ममध्ये असणाऱ्या चेन्नईला पराभवाचे ग्रहण लागल्याचे दिसतंय. अशात शुक्रवारी (दि. 5) सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध झालेला सामना देखील चेन्नईने थोडक्यात गमावलाय. चेन्नईच्या या पराभवाबद्दस कर्णधार ऋतुराज गायवाड याने प्रतिक्रिया दिली आहे.
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमध्ये शुक्रवारी सलग दुसरा पराभव पाहावा लागला. सनरायजर्स हैदराबादने सीएसकेचा 6 गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या या पराभवानंतर कॅप्टन ऋतुराज गायकवाडने हैद्राबाद येथील खेळपट्टीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘खेळपट्टी खूपच संथ होती आणि चेन्नईच्या डावावेळी ती आणखीन संथ होत गेली,’ असे ऋतुराजने सांगितले. ( Captain Ruturaj Gaikwad Comment on CSK six wicket loss Against SRH )
सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर खेळपट्टी संथ होती. त्यांनी (हैद्राबाद) गोलंदाजी चांगली केली आणि सामना नियंत्रणात ठेवला. आम्हाला फायदा घेऊ दिला नाही. मला वाटतं आम्ही सुरुवातीला चांगले खेळलो पण त्यांनी जबरदस्त पुनरागमन केलं. काळ्या मातीची खेळपट्टी होती, त्यामुळे ती संथ असेल अशी अपेक्षा होती. पण नंतरच्या षटकात आणखी संथ झाली.’
अधिक वाचा –
– चेन्नईचा सलग दुसरा पराभव, हैदराबादनं मिळवला 6 गडी राखून मोठा विजय
– अवघ्या 12 चेंडूत केलं काम तमाम! अभिषेक शर्मानं फोडून काढली चेन्नईची गोलंदाजी
– ‘..आणि किंग खान स्वतः मैदानावर उतरला’, सामना जरी कोलकाताने जिंकला तरी सर्वांची मने जिंकली ती शाहरूखनेच – पाहा व्हिडिओ