बांगलादेशचा पाकिस्तान दौरा होता. या दौऱ्यावर बांगलादेश आणि पाकिस्तान (Bangladesh And Pakistan) दोन्ही संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा 2-0 ने धुव्वा उडवला. या दौऱ्यावर बांगलादेशची कामगिरी ऐतिहासिक राहिली, तर पाकिस्तान संघ घरचे मैदान असून देखील काहीच करू शकला नाही. पराभवानंतर आता कर्णधार शान मसूदने प्रतिक्रिया दिली आहे.
शान मसूद (Shan Masood) म्हणाला, “मी खूप निराश झालो आहे. घरच्या मैदानावर सामने होते म्हणून आम्ही खूप उत्सुक होतो. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरीही अशीच राहिली. आम्ही धडा शिकलो नाही. आम्हाला वाटले की आम्ही ऑस्ट्रेलियात चांगले क्रिकेट खेळत आहोत पण आमचे काम करत नाही आणि आपण यावर काम करणे आवश्यक आहे. माझ्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात असे चार वेळा घडले आहे की आम्ही सामन्यावर वर्चस्व गाजवू शकत होतो पण आम्ही विरोधी संघाला आघाडी मिळवून दिली.”
पुढे बोलताना मसूद म्हणाला, “मला वाटते की कसोटी क्रिकेटमध्ये फिटनेसच्या बाबतीत काहीतरी वेगळे असते. पहिल्या कसोटी सामन्यात आम्ही 4 वेगवान गोलंदाजांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. कारण आम्हाला वाटले की तीन खेळाडूंसाठी कामाचा ताण व्यवस्थापित करणे कठीण होईल आणि प्रत्येक डावात वेगवान गोलंदाजाशिवाय खेळावे लागले हे या सामन्यात सिद्ध झाले.”
बांगलादेश संघ पाकिस्तानविरुद्ध कसोटीमध्ये कधीही जिंकला नव्हता. पण पाकिस्तानच्या घरच्या मैदनावर जाऊन बांगलादेशने पराभवाचा टॅग हटवला आणि ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. बांगलादेश आणि पाकिस्तान संघामधील दोन्ही कसोटी सामने रावलपिंडी मैदानावर खेळले गेले. पहिल्या सामन्यात बांगलादेशने 10 गडी राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 गडी राखून पाकिस्तानला धूळ चारली.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराची भारताला चेतावणी, वाचा काय म्हणाला?
सेहवागला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायचे नव्हते, कारण…
हरभजन सिंगच्या सल्ल्यामुळे कोहली आहे दिग्गज खेळाडू? माजी खेळाडूने केला खुलासा