---Advertisement---

घरच्या मैदानावर पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; बांग्लादेशची ऐतिहासिक कामगिरी

On: मंगळवार, सप्टेंबर 3, 2024 3:32 PM
---Advertisement---

बांग्लादेश क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला आहे. बांग्लादेशने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा 6 विकेटने पराभव केला. यासह बांग्लादेशने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. बांग्लादेशने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. बांग्लादेशच्या या ऐतिहासिक विजयात मेहंदी हसन मेराज, लिटन दास, हसन महमूद आणि नाहिद राणा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

कसोटी मालिकेतील पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानला दुसरा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता. पण शान मसूदच्या संघाला तसे करता आले नाही. दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला. यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे फलंदाज फ्लॉप ठरले आणि पहिल्या डावात संघाला केवळ 274 धावा करता आल्या.

यानंतर बांग्लादेशची पहिल्या डावात खूपच खराब सुरुवात झाली. 26 च्या धावसंख्येवर केवळ 6 विकेट पडल्या, पण संघाने जबरदस्त झुंज दिली. लिटन दासने 138 धावा केल्या आणि गोलंदाजीत 5 विकेट घेणाऱ्या मेहंदी हसन मेराजने 78 धावांची खेळी करत आश्चर्यकारक कामगिरी केली. बांग्लादेशने 26/6 वरून 262 धावा केल्या.

त्यानंतर दुसऱ्या डावातही पाकिस्तानचे फलंदाज फ्लाॅप ठरले. अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, शान मसूद आणि सौद शकील हे सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि संपूर्ण संघ अवघ्या 172 धावांत गारद झाला. पहिल्या डावातील 12 धावांच्या आघाडीच्या जोरावर पाकिस्तानने बांग्लादेशसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

सामन्याच्या चौथ्या दिवशी झाकीर हसन आणि शादमान इस्लाम यांनी बांग्लादेशला झंझावाती सुरुवात करून दिली. मात्र पाऊस आणि खराब हवामान बांग्लादेशच्या विजयात अडथळा ठरले. आता पाचव्या दिवशी इतिहास रचण्यासाठी बांग्लादेशला आणखी 143 धावा करायच्या होत्या. खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरली होती. परंतु बांग्लादेशने जबरदस्त उत्साह दाखवत केवळ चार विकेट्स गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

बांग्लादेशकडून दुसऱ्या डावात झाकीर हसनने 40, शादमान इस्लामने 24, कर्णधार नझमुल हुसेन शांतोने 38 आणि मोमिनुल हकने 34 धावा केल्या. शेवटी शाकिब अल हसन 21 धावा आणि मुशफिकर रहीम 22 धावा करून नाबाद परतले.

हेही वाचा-

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज (टी20+वनडे+कसोटी)
‘विश्वचषकात हॅटट्रिक आणि सर्वाधिक विकेट्स’, वाढदिवसादिनी जाणून घ्या शमीचे खास रेकाॅर्ड्स
Champions Trophy; पाकिस्तानात जाण्याबाबत BCCI ची भूमिका समोर, पाहा मोठे अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---