बांगलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका (Bangladesh vs South Africa) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी बांगलादेश संघ जाहीर देखील झाला आहे. त्यामध्ये शाकीव अल हसन (Shakib Al Hasan) आपला शेवटचा सामना खेळताना दिसणार की नाही? तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शकीब अल हसनचा संघात समावेश करणे आपल्या अखत्यारित नसल्याचे बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने म्हटले आहे.
शाकिबची पहिल्या कसोटीसाठी संघात निवड होऊनही त्याच्याविरोधात शहरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे त्याला परतावे लागले. त्याच्या जागी फिरकीपटू हसन मुरादचा (Hasan Murad) संघात समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच कर्णधार शांतो म्हणाला, “हे दुर्दैवी आहे, पण आम्ही कसोटी सामन्यापूर्वी याबद्दल बोलण्यात जास्त वेळ घालवू शकत नाही. शाकिब इथे येणे आमच्या हातात नाही, त्यामुळे आम्ही या विचारात जास्त वेळ घालवू शकत नाही. आम्हाला 2 महत्त्वाच्या कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि तेच खेळाडू करत आहेत. आमची योजना जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एकाला निरोप देण्याची होती. आम्हा सर्वांना वैयक्तिकरित्या असे वाटते की हे अजून येणे बाकी आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “आमचे लक्ष उद्यापासून (सोमवार) सुरू होणाऱ्या कसोटी सामना जिंकण्यावर आहे. ही त्याची फेअरवेल कसोटी असती तर आम्हाला आनंद झाला असता. तो का येऊ शकला नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आमच्या संघात 4 उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. हसन मुरादचा प्रथम श्रेणीतील रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. तो सर्व प्रकारच्या विकेट्सवर चांगली गोलंदाजी करतो. आम्ही 3 किंवा 4 फिरकीपटू निवडू, ते सर्व सक्षम आहेत. आमचे संयोजन काहीही असले तरी आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करू.”
महत्त्वाच्या बातम्या-
वीरेंद्र सेहवागचे ‘हे’ 5 रेकाॅर्ड मोडीत काढणे कोणत्याही फलंदाजासाठी अशक्य!
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, दुखापतीनंतर परतला अत्यंत महत्त्वाचा खेळाडू
IND vs NZ; दुसऱ्या कसोटीत केएल राहुलसह ‘या’ खेळाडूची होणार सुट्टी?