महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे खराब प्रदर्शन सुरूच आहे. शुक्रवारी (दि. 11 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या आठव्या सामन्यात यूपी वॉरियर्झ संघाने आरसीबीची धूळधाण उडवली. यूपीने या सामन्यात तब्बल 10 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेतील दुसरा सामना खिशात घातला. दुसरीकडे, आरसीबीचा हा स्पर्धेतील सलग चौथा पराभव ठरला. त्यामुळे चाहत्यांसह आरसीबी संघ पुन्हा एकदा निराश झाला. या पराभवानंतर कर्णधार स्मृती मंधाना हिची सर्वात मोठी प्रतिक्रिया आली. तिने या पराभवासाठी स्वत:ला दोषी ठरवले आहे.
काय म्हणाली स्मृती?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Chellengers Bangalore) संघाच्या पराभवानंतर कर्णधार स्मृती मंधाना (Captain Smriti Mandhana) हिने पराभवासाठी स्वत:ला जबाबदार ठरवले. तसेच, फलंदाजी क्रमाने स्पर्धेत आपल्या क्षमतेनुसार प्रदर्शन केले नसल्याचेही तिने सांगितले. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) म्हणाली की, “मला वाटते, मागील चार सामन्यांपासून असे होत आहे. आम्ही चांगली सुरुवात करतो आणि एकसोबत अनेक विकेट गमावतो. मी स्वत:लाही दोषी ठरवेल. वरच्या फळीतील फलंदाजांच्या रूपात आम्हाला गोलंदाजांच्या बचावासाठी धावा करण्याची गरज आहे.”
Stay strong, captain! Let’s turn it around. 🙌#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2023 pic.twitter.com/LRvv9pXaAi
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 10, 2023
मधल्या षटकातील योजनेचाही केला खुलासा
पुढे बोलताना स्मृती म्हणाली की, “7-15 षटकादरम्यान आम्ही 7-8 धावा प्रति षटक करण्याबाबत बोललो होतो. आज ते उपयोगी पडले नाही. आम्ही एक संतुलित संंघ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. कसं होतंय ते पाहूया. मी सर्व खेळाडूंशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला. मला ते करत राहावे लागेल. मागील आठवडा संघासाठी खूपच कठीण राहिला. विचार करण्यासाठी बरेच काही आहे आणि खूप काम करायचे आहे.”
Gutted! 💔#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2023 #RCBvUPW pic.twitter.com/h4DWQZ5wy2
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 10, 2023
सामन्याचा थोडक्यात आढावा
आरसीबी (RCB) संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ते पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. एकट्या एलिस पेरी हिने 52 धावा करत अर्धशतक पूर्ण केले. तिच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबी संघ 19.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 138 धावा करू शकला. या आव्हानाचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्झ संघाकडून कर्णधार एलिसा हिली (Alyssa Healy) हिने वादळी फलंदाजी करत नाबाद 96 धावा चोपल्या. त्यामुळे हे आव्हान यूपीने फक्त 13 षटकात गाठले. यावेळी हिलीला देविका वैद्य हिने साथ दिली आणि नाबाद 36 धावा केल्या. (captain smriti mandhana shares blame after rcb 4th loss in wpl 2023 against up warriorz)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL2023 : आरसीबीचा सलग चौथा पराभव, यूपी वॉरियर्झचा विक्रमी विजयी, वाचा RCBच्या पराभवाची प्रमुख 3 कारणे
आरसीबीला लोळवत यूपी वॉरियर्झचा भीमपराक्रम, केली WPLमध्ये कुठल्याच संघाला न जमलेली कामगिरी