वेस्ट इंडिज संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने झाली असून पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. तसेच, दुसरा कसोटी सामना 8 मार्चपासून खेळला जात आहे. यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तसेच, यजमान संघ तब्बल 356 धावांनी आघाडीवर खेळत आहे. विशेष म्हणजे, कर्णधार टेंबा बावुमा याने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. कर्णधार म्हणून हे त्याचे पहिलेच शतक ठरले. तब्बल 7 वर्षांनंतर त्याने अशी कामगिरी केली.
खरं तर, यापूर्वी टेंबा बावुमा (Temba Bavuma) याने सन 2016मध्ये कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक साजरे केले होते. अशात दुसरे शतक ठोकताच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे. यामध्ये टेंबा बावुमाचे वडील (Temba Bavuma Father) सामना पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये उपस्थित होते. बावुमाने शतक ठोकताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते आपल्या मुलाचे शतक पाहून जोरजोरात टाळ्या वाजवताना दिसले.
Father of Temba Bavuma clapping for his son's hundred ❤️#SAvWI #WIvSA pic.twitter.com/QrDuXy1xx6
— Drink Cricket 🏏 (@Abdullah__Neaz) March 10, 2023
What a beautiful moment.
First Test century as a captain in front of his father, Take a bow, Temba Bavuma when the team was under huge pressure in the 2nd innings. pic.twitter.com/PFyvNgtSwC
— Johns. (@CricCrazyJohns) March 10, 2023
बावुमाने ठोकले कसोटी कारकीर्दीतील दुसरे शतक
टेंबा बावुमा याला मागील महिन्यात डीन एल्गरच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार म्हणून नेमले होते. मात्र, बावुमाला कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात खास कामगिरी करता आली नाही. तो दोन्ही डावात शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याने दमदार शतक झळकावत 7 वर्षांचा दुष्काळ संपवला. हे शतक 56व्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाले.
A seven-year wait ends for Temba Bavuma.
Read more on his brilliant knock 👉 https://t.co/IenzFefybz#WTC23 | #SAvWI pic.twitter.com/GhQ8cD1E5n
— ICC (@ICC) March 11, 2023
खरं तर, बावुमाने यापूर्वी जानेवारी 2016मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात शतक ठोकले होते. पहिल्या डावातच बावुमा 102 धावांवर नाबाद होता. हे बावुमाचे कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक होते. त्याने आता 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा दमदार शतक झळकावत टीकाकारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. (temba bavuma first test century as a captain in front of his father sa vs wi 2nd test photo viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलग चौथ्या लाजीरवाण्या पराभवानंतर स्मृती मंधानाची सर्वात मोठी प्रतिक्रिया, स्वत:ला ठरवले दोषी; म्हणाली…
WPL2023 : आरसीबीचा सलग चौथा पराभव, यूपी वॉरियर्झचा विक्रमी विजयी, वाचा RCBच्या पराभवाची प्रमुख 3 कारणे