भारतात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघा एक आठवडा उरला आहे. यासाठी सर्व संघ एकापाठोपाठ एक असे भारतात पोहोचत आहेत. अलीकडेच पाकिस्तान संघ या स्पर्धेसाठी भारतात दाखल झाला. यापूर्वी 25 सप्टेंबर रोजी दक्षिण आफ्रिका संघही स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात पोहोचला होता. अशात क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा आपल्या मायदेशात परतला आहे.
विश्वचषक 2023 स्पर्धेतून मायदेशात परतला बावुमा
खरं तर, दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) मायदेशी परतण्यामागे कौटुंबिक कारण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तो अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील सराव सामने खेळू शकणार नाही. सराव सामन्यात बावुमाच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका टी20 संंघाचा कर्णधार एडेन मार्करम (Aiden Markaram) कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडेल. मात्र, बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या संघात उपलब्ध राहील. याची माहिती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एक निवेदन जारी करत दिली आहे.
🟢#CWC23 TEAM UPDATE 🟡
🏏Proteas ODI Captain Temba Bavuma will travel back home due to family reasons
Bavuma misses 2️⃣ #CWC23 warm-up matches
🆚️Afghanistan 🇦🇫
🆚️New Zealand 🇳🇿Markram will captain in his absence #BePartOfIt pic.twitter.com/iC3PwcSPrY
— Proteas Men (@ProteasMenCSA) September 28, 2023
त्यांनी निवेदनात म्हटले की, “बावुमा अनुक्रमे 29 सप्टेंबर आणि 02 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या 2 आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेतील सराव सामने खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत एडेन मार्करम संघाचे नेतृत्व करेल.”
Temba Bavuma is flying back home due to personal reasons.
He'll miss the Warm Up matches for South Africa. (Espncricinfo). pic.twitter.com/WmMhhWekuU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2023
बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचे शानदार प्रदर्शन
विश्वचषक 2023 स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघ आपला पहिला सामना 7 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअममध्ये होईल. बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने वनडे क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. अलीकडेच त्यांनी 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला 3-2ने पराभवाचा धक्का दिला. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास खूपच वाढला असेल.
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), गेराल्ड कोएट्जी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, हेन्रीच क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एंडिले फेहलुकवायो, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी व्हॅन डर डुसेन, लिजाद विलियम्स (captain temba bavuma is flying back home due to personal reasons and will miss world cup 2023 warm up matches)
हेही वाचा-
Breaking: बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप! वर्ल्डकप आधीच कर्णधार शाकिबची निवृत्तीची घोषणा
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! वर्ल्डकपपूर्वी ऐन मोक्याच्या क्षणी बाहेर झाला जबरदस्त खेळाडू, लगेच वाचा