---Advertisement---

विजय मिळवूनही निराश झाला कीवी कर्णधार; म्हणाला, ‘माझ्या करिअरमधली सर्वात खराब…’

On: रविवार, डिसेंबर 10, 2023 1:35 PM
Tim-Southee
---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. वनडे मालिका न्यूझीलंडने 2-0ने खिशात घातली. त्यानंतर कसोटी मालिका 1-1ने बरोबरीत सुटली. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी (दि. 9 डिसेंबर) बांगलादेशला 4 विकेट्सने पराभूत करत न्यूझीलंडने विजय मिळवला. मात्र, न्यूझीलंड संघाचा कर्णधार टीम साऊदी याने खेळपट्टीविषयी नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाला साऊदी?
न्यूझीलंड संघाचा कर्णधार टीम साऊदी (Tim Southee) याने म्हटले की, त्याने त्याच्या कारकीर्दीतील ही सर्वात खराब खेळपट्टी पाहिली. खरं तर, बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड संघात एकूण 178.1 षटकांचा सामना झाला, ज्यात एकूण 36 विकेट्स पडल्या. यातील 30 विकेट्स या फिरकीपटूंनी घेतल्या. कसोटी सामन्यात सर्वात कमी चेंडू फेकले जाणारा हा तिसरा कसोटी सामना ठरला. या सामन्यात एकूण 1069 चेंडू टाकले गेले. साऊदीच्या मते, खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर बनवली गेली, ज्यामुळे सामना असा झाला.

सामन्यानंतर साऊदी म्हणाला, “ही माझ्या कारकीर्दीतील सर्वात खराब खेळपट्ट्यांपैकी एक राहिली. बॅट आणि चेंडूतील संतुलन गोलंदाजांच्या बाजूने जास्त दिसले. माझ्या मते 170 षटकांच्या (178.1) सामन्यातून ही गोष्ट चांगल्याप्रकारे समजली जाऊ शकते. आमच्या खेळाडूंसाठी इथे विजय मिळवणे आनंदाची बाब ठरली.”

पुढे बोलताना साऊदी म्हणाला, “माझ्या मते, हा एक चांगला कसोटी सामना राहिला नाही. ही कठीण खेळपट्टी होती. धावा करताना संघर्ष करावा लागत होता. छोटे क्षण आणि सामन्यादरम्यानची भागीदारी महत्त्वाची ठरली. तसेच, इतर सामन्यांचा विचार केला, तर माझ्या मते, स्थिती चेंडू आणि बॅटमध्ये काही प्रमाणात चांगली आहे. तसेच, यावर सहजरीत्या लक्ष जात नाही.”

न्यूझीलंडचा विजय
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी 30 षटकांचा खेळ संपल्यानंतर बांगलादेशला विजयासाठी 4 विकेट्स आणि न्यूझीलंडला विजयासाठी 47 धावांची गरज होती. न्यूझीलंड संघ 6 बाद 90 धावांवर खेळत होता. यावेळी मेहिदी हसन मिराझ टाकत असलेल्या 40व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स याने चौकार मारत सामना खिशात घातला. तसेच, मालिका 1-1ने बरोबरीत सोडडवली. या सामन्यात कर्णधार टीम साऊदीने फक्त पहिल्याच डावात फलंदाजी केली. त्याने 15 चेंडूंचा सामना करताना फक्त 14 धावा केल्या. यात 1 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता. (captain tim southee called dhaka pitch worst after new zealand beat bangladesh)

हेही वाचा-
युवराजला का मिळत नाही वर्ल्डकप 2011चे श्रेय?, रोखठोक मत मांडत गंभीर म्हणाला, ‘त्याच्याकडे…’
टी20 वर्ल्डकपमध्ये कोण असेल भारताचा कर्णधार? बीसीसीआय सचिव जय शाह म्हणतात…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---