---Advertisement---

कर्णधार म्हणूनही विराट कोहली ठरला हिट; केला हा मोठा पराक्रम

On: रविवार, ऑक्टोबर 28, 2018 7:40 PM
---Advertisement---

पुणे। शनिवारी(27 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात विंडीजने 43 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करुन चांगली लढत दिली होती. परंतू अन्य फलंदाजांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला हा पराभव स्विकारावा लागला.

या सामन्यात विराटने 119 चेंडूत 107 धावा केल्या. यात त्याने 10 चौकार आणि 1 षटकार मारले. हे त्याचे वनडेतील 38 वे शतक आहे. तसेच कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 33 वे शतक आहे.

विराटच्या या कामगिरीमुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज कर्णधार ग्रॅमी स्मिथची बरोबरी केली आहे.

ग्रॅमी स्मिथने कर्णधार म्हणून 286 सामन्यात खेळताना 33 शतके केली आहेत. तर विराटने 114 सामन्यात कर्णधार म्हणून 33 शतके पूर्ण केली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत आॅस्ट्रेलियाचा माजी महान कर्णधार रिकी पॉटींग आहे. पॉटींगने कर्णधार म्हणून 41 शतके केली आहेत. ही शतके पॉटींगने 324 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार म्हणून खेळताना केली आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करणारे खेळाडू:

41 – रिकी पॉटींग

33 – विराट कोहली

33 – ग्रॅमी स्मिथ

20 – स्टीव्ह स्मिथ

महत्त्वाच्या बातम्या:

असा ‘विराट’ पराक्रम करणारा कर्णधार कोहली ठरला पहिलाच क्रिकेटपटू

भारत ‘क’ने पटकावले देवभर ट्रॉफीचे विजेतेपद; अजिंक्य रहाणे ठरला विजयाचा हिरो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment