---Advertisement---

विराटचा गुरुमंत्र ठरला ‘यंगिस्तान’च्या विजयाचा मंत्र; कर्णधार यश धूलने केला खुलासा

On: मंगळवार, फेब्रुवारी 8, 2022 8:30 PM
ind-u19
---Advertisement---

भारतीय १९ वर्षाखालील संघाने (u19 team india) नुकतेच विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. यश धूल (yash dhull) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम सामन्यात इंग्लंड संघावर मात करत विजय मिळवला. १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहली (virat kohli) याने युवा संघासोबत संवाद साधला होता. विराट कोहलीनेही १९ वर्षाखालील संघाचे नेतृत्व करताना विश्वचषक जिंकला होता. अशात त्याचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे यावर्षीच्या युवा संघाला त्याचा फायदा झाल्याचे दिसत आहे. कर्णधार यश धूलनेही यासंदर्भात माहिती दिली आहे,

एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार यश धूलने विराट कोहलीकडून मिळालेल्या मार्गदर्शनाची माहिती दिली आहे. धूल म्हणाला की, “त्यांनी (विराट) सांगितले की, कोणत्याही इतर सामन्याप्रमाणेच अंतिम सामना खेळा. अंतिम सामन्याचा दबाव घेऊ नका. त्यांच्याशी चर्चा केल्यामुळे मला खूप फायदा झाला. तुम्ही पाहिले असेल की, संघ दबावात खेळला नाही. विराट भैयांच्या अनुभवामुळे संघाला खूप फायदा झाला.”

अंतिम सामन्यातील विजयानंतर झालेल्या जल्लोषाची माहिती देताना धूल म्हणाला की, “आम्ही सर्वात आधी मैदानावर जल्लोष केला. नंतर संघाची बैठक झाली आणि त्यानंतर जल्लोष केला गेला. आता आम्हाला जमिनीवर टिकून राहावे लागेल. आम्हाला माहिती आहे की, पुढचा प्रवास इथूनच ठरवायचा आहे, त्यामुळे आम्हाला आमचे पाय जमिनीवर मजबूतीने टिकवण्याची गरज आहे.”

दरम्यान, भारतीय संघाचे १९ वर्षाखालील विश्वचषकातील प्रदर्शन पाहता, ते खूपच उत्कृष्ट राहिले आहे. अंतिम सामन्यात इंग्लंड संघ प्रत्येक विभागात भारतीय संघाच्या मागे राहिल्याचे दिसले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १८९ धावा बनवल्या. इंग्लंडला सर्व ५० षटकेही खेळता आली नाहीत. इंग्लंडने ४४.५ षटकात १८९ धावा केल्या आणि संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ४७.४ षटकांमध्ये आणि ६ विकेट्सच्या नुकसानावर गाठले.

विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे वैशिष्ट असे राहिले की, संघाने एकाही सामन्यात पराभव पत्करला नाही. याच पार्श्वभूमीवर अंतिम सामन्यासाठी संघाला अधिक आत्मविश्वास मिळाला. यापूर्वी १९ वर्षाखालील भारतीय संघाने चार विश्वचषक जिंकले होते, ही पाचवी वेळ आहे, जेव्हा संघाने विजेतेपद जिंकले आहे.

महत्वाच्या बातम्या –

काय सांगता! आयपीएल लिलावात आरसीबी ‘या’ तीन खेळाडूंवर खर्च करू शकते तब्बल २७ कोटी

शिखर धवन, श्रेयस अय्यरची कोरोना टेस्ट तर निगेटिव्ह, पण खेळणार का दुसरा वनडे?

हरभजन म्हणतोय,’ अनिल भाई तुम्ही खूप लालची आहात’; वाचा‌ संपूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---