Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कर्णधारपद ते नो-बॉल ड्रामा! 2022 वर्षात ‘या’ पाच घटना ठरल्या वादग्रस्त

कर्णधारपद ते नो-बॉल ड्रामा! 2022 वर्षात 'या' पाच घटना ठरल्या वादग्रस्त

December 31, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Virat Kohli & Rohit Sharma

Photo Courtesy: twitter/BCCI


क्रिकेटच्या दृष्टीने 2022 वर्ष विशेष राहिले, कारण या वर्षात अनेक विश्वचषक खेळले गेले. त्याचबरोबर अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर धमाकेदार कामगिरी करत इतिहास रचला. तसेच अनेक युवा खेळाडूंनी पदार्पणही केले. असे होत असताना काही घटनांनी मात्र क्रिकेटचे वातावरण दूषित झाले. ज्यामध्ये खेळाडूंपासून बोर्डपर्यंत अनेक जणांचा समावेश आहे. या लेखात आपण असे काही वादग्रस्त घटना पाहणार आहोत.

5 आशिया कपचे यजमानपद
आशिया कप (Asia Cup) 2023चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, मात्र मागील काही महिन्यांपासून यावर अधिक चर्चा सुरू आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे यजमानपद काढावे कारण भारत आशिया कप खेळण्यास पाकिस्तानमध्ये जाणार नाही, अशा वक्तव्यांना उधान आले. त्यातच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारत पाकिस्तानला न जाता न्यूट्रल वेन्यूवर खेळेल असे विधान केले. त्याला पाकिस्तान बोर्डनेही उत्तर दिले. ते म्हणाले, जर भारत पाकिस्तानला येत नसेल तर पाकिस्तानही 2023मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतात जाणार नाही. मात्र काही दिवसांपासून पाकिस्तानच्या हालचालीत सकारात्मक बदल झालेले दिसत आहेत.

4 नो-बॉल ड्रामा
ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत साखळी फेरीत भारताने पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या अंतिम षटकात चढाओढ दिसली. मोहम्मद नवाज याच्या त्या षटकात षटकार, वाईट बॉल, विकेट, नो-बॉल आणि फ्री हीट हे सर्व पाहायला मिळाले. यातील नो-बॉलमुळे अनेक वाद निर्माण झाले. भारताला त्यावेळी 3 चेंडूत 13 धावांची आवश्यकता होता आणि नवाजने षटकातील चौथा चेंडू विराट कोहली (Virat Kohli) याला फुल टॉस टाकला. तो रिप्लेमध्ये विराटच्या कमरेवर दिसला. ज्यावर कोहलीने षटकार मारला. त्या चेंडूवर पंचांनी आधी काहीच रिऍक्शन दिली नाही, मात्र विराटच्या म्हणण्यानंतर त्यांनी निर्णय बदलला.

3 मंकडींग वाद
मंकडींग शब्द आला की सर्वात पहिले आर अश्विन (R Ashwin) याने जोस बटलरला बाद केलेले आठवते. यावर्षी त्याने नाहीतर भारताची महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) या शब्दाने चर्चेत राहिली. सप्टेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात तिने इंग्लंडच्या चार्ली डीन हिला मंकडींगने बाद केले. त्यानंतर क्रिकेटविश्व दोन भागांमध्ये विभागले गेले. अनेक आजी-माजी खेळाडूंनी दीप्तिला पाठींबा दर्शविला. नियमानुसार तिने बरोबर केले असे अनेकांचे म्हणणे होते. या सामन्यात तिने चेंडू टाकण्याआधी डीन क्रीझच्या पुढे गेली होती.

2 कर्णधारपदाचा राजीनामा
वर्षाच्या सुरूवातीलाच भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला जेव्हा विराटने कसोटीचेही कर्णधारपद सोडले. अनेकांनी त्याबाबत व्यक्त होताना म्हटले ज्या पद्धतीने विराटकडून वनडे नेतृत्व हिसकावले गेले, त्यामुळे हा अनुभवी खेळाडू खूप दु:खी झाला असावा. झाले असे की, विराटने 2021 टी20 विश्वचषकानंतरच भारताच्या टी20 संघाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर त्याच्याकडून वनडे कर्णधारपदही काढून घेतले. यामुळे तो क्रिकेटच्या दीर्घ प्रकारात तरी त्याचे नेतृत्व करताना दिसेल, अशी अपेक्षा असताना त्याने चाहत्यांची निराशा केली.

1 रेप केस
यावर्षी श्रीलंका क्रिकेटने आशिया कप जिंकत सगळ्यांना आश्चर्यचकित केले, मात्र त्यांच्या एका खेळाडूने या आनंदावर विरजण टाकले. दनुष्का गुनातिलका (Danushka Gunathilaka) याच्यावर नोव्हेंबर महिन्यात एका महिलेने रेपचा आरोप लावला. तेव्हा संघ ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक खेळत होता. त्या स्पर्धेतून गुनातिलका दुखापतीमुळे स्पर्धाबाहेर होता, मात्र तो तरीही संघासोबत होता. या आरोपामुळे सिडनी पोलिसांनी त्याला अटकही केली. काही दिवसानंतर त्याला जामीनावर सोडले गेले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवीन वर्षात रोहित-राहुलवर प्रश्नांची सरबत्ती! बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये
पत्रकाराने प्रश्न विचारताच बाबरला आला राग, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया


Next Post
Anupam Kher and Anil Kapoor

भीषण कार अपघातातून बचावलेल्या रिषभ पंतची 'या' बॉलिवूड कलाकारांनी घेतली भेट

Team India

भारताच्या 'या' खेळाडूने प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वत:ला केले सिद्ध, यावर्षी लावली सामनावीर पुरस्कारांची रांग!

Rohit Sharma crying

क्रीडाविश्वात 2022मध्ये घडलेले भावूक 3 क्षण, ज्यांनी चाहत्यांच्याही डोळ्यात आणले पाणी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143