नव्याने सुरू होत असलेल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीग (एसए टी20 लीग) या स्पर्धेची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील अनेक नामांकित खेळाडू खेळताना दिसणार आहेत. मात्र, या नव्या स्पर्धेत क्रिकेट जगताला एक नवा नियम पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये नाणेफेकीनंतर अंतिम अकरा खेळाडूंची यादी जाहीर करण्यात येईल.
दक्षिण आफ्रिका क्रिकेटला मोठी अपेक्षा असलेल्या या स्पर्धेत अनेक नवीन पाहायला मिळणार आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे नाणेफेकीआधी संघांना त्यांची प्लेइंग इलेव्हन द्यायची सक्ती नसेल. नाणेफेकीवेळी प्रत्येक कर्णधार 13 खेळाडूंची यादी घेऊन नाणेफेकीसाठी येईल. त्यानंतर नाणेफेक झाल्यानंतर त्यातून 11 खेळाडूंची निवड होईल. तर, उर्वरित दोन खेळाडू क्षेत्ररक्षक म्हणून सामन्यात सहभागी होतील.
याव्यतिरिक्त आणखी दोन नवे नियम देखील या स्पर्धेत पाहता येतील. जाणीवपूर्वक मारलेल्या थ्रोवर ओव्हर थ्रोच्या धावादेखील देण्यात येणार नाहीत. यासोबतच नो बॉलवर चेंडू स्टम्प्सला धडकल्यानंतर फलंदाजांना धावा घेता येणार नाहीत. तसेच या स्पर्धेत बोनस गुणाचा देखील नवा नियम सामील असेल.
दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये सहा संघ सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व संघ आयपीएलमधील फ्रॅंचायजीने विकत घेतले आहेत. आयपीएलप्रमाणे खेळाडूंचा लिलाव होणारी ही केवळ दुसरी लीग आहे. लीगची सुरुवात 10 जानेवारी रोजी एमआय केपटाऊन विरुद्ध पार्ल रॉयल्स यांच्यातील सामने होईल. स्पर्धेत एकूण 33 सामने खेळले जातील. अंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.
(Captains can select teams after toss in SA20 league)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्र केसरी’ला महिंद्रा थार जीपचे बक्षीस
सूर्याने सांगितले आपल्या ‘सिक्रेट कोच’चे नाव! दिले आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे श्रेय