---Advertisement---

राष्ट्रीय संघापेक्षा फ्रँचायझीला अधिक प्राधान्य देत आहेत इंग्लिश खेळाडू, कर्णधार बटलर नाराज

On: रविवार, फेब्रुवारी 5, 2023 3:11 PM
Jos Buttler
---Advertisement---

इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलर हा सध्या नाराज असल्याचे दिसते.  परंतु या नाराजीचे कारण काय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. पण आता या प्रश्नाचे निरसन स्वत: जोस बटलर याने केले आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी फ्रँचायझी क्रिकेटला प्राधान्य देत असल्याचे दिसते. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सर्वोत्तम संघ निवडू न शकल्याने बटलरने नाराजी व्यक्त केली आहे. चला सविस्तर जाणून घेऊ की, काय आहे नेमके प्रकरण…

इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) यानेने कबूल केले आहे की, खेळाडूंनी फ्रँचायझी क्रिकेटला प्राधान्य दिल्याने आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी सर्वोत्तम संघ निवडू न शकल्याने तो नाराज आहे. एलेक्स हेल्स, सॅम बिलिंग्ज आणि डेव्हिड विली यांनी फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यासाठी मार्च मध्ये हाेणाऱ्या बांग्लादेश विरुद्धच्या मालिकेत खेळण्यासाठी नकार दिला आहे.

बटलरने मिडियाला सांगितले की, “आम्हाला आमचा सर्वोत्तम संघ निवडायचा आहे.” विश्वचषक आणि आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्ये कधी कधी निराशा येते की आपण हे करू शकत नाही, पण मी खेळाडूंचा निर्णय समजू शकतो. मला त्यांच्या निर्णयाचा आदर आहे. इग्लंड 2019 विश्वचषकापासून ते आतापर्यंत खेळल्या गेेलेल्या 33 वनडे सामन्यात 37 खेळाडूंना निवडले गेले आहे.

बटलर म्हणाला, “ही एक विचित्र परिस्थिती आहे. ज्या पद्धतीने सामने नियोजित आहेत. त्यामुळे मला दोन्ही बाजू समजून घ्याव्या लागतात. इंग्लंडचा कर्णधार असल्यामुळे मला सर्वोत्कृष्ट खेळाडूंनी खेळावे असे वाटते, पण खेळाडूंच्या दृष्टिकोनातून पाहता इंग्लंड संघासाठी खेळणे आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळणे यात खूप फरक आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशांमध्येही खूप फरक पडतो.

बांगलादेश दौऱ्यापूर्वी इंग्लंडने दोन नवीन खेळाडू टॉम एबेल आणि रेहान अहमद यांची संघात निवड केली आहे. बटलर म्हणाला, “या परिस्थितीत तुम्हाला सर्वोत्तम पर्याय निवडावा लागतो. जर कोणी खेळले नाही तर दुसर्‍याला संधी मिळेल. पण मला अशा परिस्थितीत जायचे नाहीये की, असे वाटू लागेल की हा ठरावी खेळाडू पुन्हा कधीच इंग्लंडसाठी खेळणार नाही.” (Captains of the England cricket team Jos Buttler Frusted because england team choose franchise cricket)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात नाकी नऊ आणणारे जबरदस्त गोलंदाज, यादीत ‘हा’ एकमेव भारतीय
असे 7 क्रिकेटपटू ज्यांचे षटकार चिरकाल राहतील आठवणीत! नेमके कोण आहेत हे खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---