कोलकाता। भारत विरुद्ध बांगलादेश संघात(India vs Bangladesh) कालपासून(22 नोव्हेंबर) सुरु झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात(Day-Night Test) भारताचा कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) शतकी खेळी केली आहे.
इडन गार्डनवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात खेळताना विराटने 194 चेंडूत 136 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 18 चौकार मारले. त्यामुळे तो दिवस-रात्र कसोटीमध्ये शतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याचबरोबर दिवस-रात्र कसोटीत शतक करणारा तो जगातील एकूण 5 वा कर्णधार ठरला आहे. याआधी फाफ डुप्लेसिस, स्टिव्ह स्मिथ, जो रुट आणि केन विलियम्सन यांनी प्रत्येकी 1 शतक दिवस रात्र कसोटीत कर्णधार म्हणून केले आहे.
कालपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित करत 241 धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर संपुष्टात आला होता.
तसेच आज(23 नोव्हेंबर) दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशने दुसऱ्या दिवसाखेर 6 बाद 152 धावा केल्या आहेत. ते अजून 89 धावांनी पिछाडीवर आहे.
दिवस-रात्र कसोटीमध्ये शतके करणारे कर्णधार –
– फाफ डूप्लेसिस (दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2016)
– स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, 2016)
– जो रुट (इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, 2017)
– केन विलियम्सन (न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, 2018)
– विराट कोहली (भारत विरुद्ध बांगलादेश, 2019)
…आणि कर्णधार कोहलीने रिकी पॉंटींगच्या या विक्रमाला दिला धक्का!
वाचा👉https://t.co/jhqLUHU8hM👈#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) November 23, 2019
'कॅप्टन' कोहली रिकी पॉटिंगला पडला भारी, आता केवळ हा दिग्गज आहे पुढे
वाचा👉https://t.co/V3t22XmQi4👈#म #मराठी #INDvsBAN #cricket @Mazi_Marathi @MarathiRT #TeamIndia #DayNightTest #PinkBall #PinkBallTest #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) November 23, 2019