सिडनी। भारताने रविवारी (६ डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ६ विकेट्ने विजय मिळवला. भारताने या मालिकेतील पहिला सामना ११ धावांनी जिंकला होता. त्यामुळे भारताने दुसरा सामना जिंकून टी२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. याबरोबरच विराटच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिकेत विजय मिळवणारा कर्णधार
विराटच्या नेतृत्वाखाली २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने वनडे आणि कसोटी मालिका जिंकली होती आणि आता दोन वर्षाने भारताने त्याच्या नेतृत्वाखाली टी२० मालिकाही जिंकली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिकेत (वनडे, कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२०) विजय मिळवणारा तो पहिलाच भारतीय तर जगातील ऑस्ट्रेलियाबाहेरचा दुसरा कर्णधार ठरला आहे.
त्याच्या आधी केवळ दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधार म्हणून तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिकेत विजय मिळवला आहे.
एवढेच नाही तर मायदेशाबाहेर खेळताना तीन वेगवेगळ्या देशात तिन्ही क्रिकेटप्रकारच्या मालिका जिंकणारा विराट एकमेव कर्णधार आहे. विराटने कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त श्रीलंकेत आणि कॅरेबियन बेटांवर म्हणजेच वेस्ट इंडिजच्या घरच्या मैदानांवर तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिका जिंकल्या आहेत.
त्याच्याव्यतिरिक्त केवळ पाकिस्तानच्या मिस्बाह उल हकने कर्णधार म्हणून मायेदेशाबाहेर २ देशात तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिका जिंकल्या आहेत. मिस्बाहने झिम्बाब्वे आणि बांगलादेशमध्ये तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिका कर्णधार म्हणून जिंकल्या आहेत.
मायदेशाबाहेर वेगवेगळ्या देशात तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिकांमध्ये विजय मिळवणारे कर्णधार –
ऑस्ट्रेलिया – फाफ डु प्लेसिस, विराट कोहली
वेस्ट इंडिज – ग्रॅमी स्मिथ, विराट कोहली
श्रीलंका – विराट कोहली
न्यूझीलंड – रिकी पाँटिंग
झिम्बाब्वे – मिस्बाह उल हक, केन विलियम्सन, रॉस टेलर
बांगलादेश – मिस्बाह उल हक
महत्त्वाच्या बातम्या –
“मलाही आश्चर्य वाटले”, ‘त्या’ फटक्यावर कोहलीची गमतीशीर प्रतिक्रिया
Video – वाढदिवशी श्रेयस अय्यरने ठोकला तब्बल ‘इतक्या’ मीटरचा षटकार की विराटही झाला अचंबित
दुसऱ्या टी२० सामन्यानंतर कोहलीला आली ‘हिटमॅनची’ आठवण; पहा काय म्हणाला
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग