---Advertisement---

“मलाही आश्‍चर्य वाटले”, ‘त्या’ फटक्यावर कोहलीची गमतीशीर प्रतिक्रिया

On: सोमवार, डिसेंबर 7, 2020 8:56 AM
---Advertisement---

भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करत टी-२० मालिकेवर कब्जा केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले १९५ धावांचे आव्हान भारताने १९.४ षटकांत ६ गडी राखून पूर्ण केले. २२ चेंडूत ४२ धावा काढत भारताचा विजय सुनिश्चित करणार्‍या हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने देखील २४ चेंडूत ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. मात्र या खेळीत त्याने मारलेल्या स्कूपच्या फटक्याची सामन्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

“मलाही अनपेक्षित होते”

भारतीय संघ फलंदाजी करत असताना १५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने अँड्र्यू टायच्या गोलंदाजीवर शॉर्ट फाइन लेगला स्कूपचा फटका खेळला. हा फटका थेट सीमापार गेलेला पाहून समालोचकांसह दर्शकही अवाक झाले. आपल्या नैसर्गिक स्वभावाविरुद्ध विराटने खेळलेला हा फटका पाहून अनेकांना एबी डिविलियर्सशी आठवण झाली.

या फटक्याबाबत खुद्द कोहलीलाच विचारले असता तो म्हणाला, “तो अतिशय मजेशीर क्षण होता. मी स्वतःदेखील हा फटका खेळल्याने आश्चर्यचकित झालो होतो. एबी डिविलियर्सला काय वाटले असेल माहीत नाही, परंतु आज रात्री त्याला मी नक्कीच मेसेज करेन आणि त्याची प्रतिक्रिया विचारेन.”

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ

भारतीय कर्णधाराच्या या अफलातून षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर काल वेगाने व्हायरल झाला. अनेकांनी हा फटका पाहून त्याची तुलना दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सशी केली. डिविलियर्स हा फटका नियमितपणे खेळत असल्याने आरसीबीकडून खेळतांना विराट कोहलीने त्याच्याकडून हा स्कूपचा फटका शिकून घेतला असावा, अशी मजेशीर टिप्पणीही काही जणांनी केली आहे. डिविलियर्सने देखील या फटक्यावर प्रतिक्रिया देताना कोहलीला दाद दिली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा टी२० सामना मंगळवारी(८ डिसेंबर) होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Video – वाढदिवशी श्रेयस अय्यरने ठोकला तब्बल ‘इतक्या’ मीटरचा षटकार की विराटही झाला अचंबित

दुसऱ्या टी२० सामन्यानंतर कोहलीला आली ‘हिटमॅनची’ आठवण; पहा काय म्हणाला

भारताच्या ‘या’ खेळाडूला पाहुन ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाला आली एमएस धोनीची आठवण

ट्रेंडिंग लेख –

आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---