काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटर अजिंक्य रहाणेने नवी कोरी बीएमडब्ल्यू 630i M Sports कार खरेदी केली. आयपीएल संपताच घरी गेल्यावर रहाणेने आपल्या गॅरेजमध्ये ७० लाखांच्या या कारचा समावेश केला. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची ही किंमत. मात्र, आम्हाला प्रश्न पडला की, रहाणेसारखा फारसा शो ऑफ न करणारा क्रिकेटर इतकी महाग कार विकत घेत असेल तर विराट कोहली, रोहित शर्मा, एमएस धोनी यांच्या कारची किंमत काय असावी? या प्रश्नाचे निरसन करण्यासाठी आम्ही थोडा शोध घेतला. आणि त्यानंतर ज्या किमती समोर आल्या, त्या ऐकून धक्का बसला. या लेखात तुम्हीही जाणून घ्या की, भारतीय क्रिकेटर किती किमतीच्या गाड्या वापरतात?
क्रिकेटर्स आणि गाड्या हा विषय निघाल्यावर सर्वात पहिल्यांदा जे नाव डोळ्यासमोर येते ते नाव म्हणजे एमएस धोनी. धोनी गाड्यांचा किती मोठा शौकीन आहे हे कोणालाही नव्याने सांगायला नको. त्याच्या गॅरेजमध्ये ७० पेक्षा जास्त बाईक आणि कार्सचे कलेक्शन आहे. फक्त कार्सचा विचार केला तर, धोनी जवळ अनेक लक्झरी कार्स आहेत. त्याच्या कार्सची नावे घ्यायची झाली तर हमर एच २, ऑडी Q7, मित्सुबिशी पजेरो SFX, लॅंडरोवर फ्रीलॅंडर, फरारी 599 GTO तसेच इंडियन आर्मी वापरत असलेली जोंगा जीप ही आहेत. मात्र, धोनीची सर्वात महागडी कार आहे जीप ग्रँड चिरोके ट्रॅकहॉक. भारतात या कारची किंमत १ कोटी ५० लाख इतकी आहे. धोनी व्यतिरिक्त भारतात ही कार फक्त बॉलिवूड स्टार सैफ अली खान वापरतो. त्याआधी धोनी पोर्श ९११ ही त्याची कार २ कोटी रुपयांची होती.
महागड्या कारचा ट्रेंड क्रिकेटमध्ये आणला मायकल शूमाकरने. तुम्ही म्हणाला मायकल शूमाकर आणि क्रिकेटचा काय संबंध?. पण होय हे खरे आहे. फॉर्म्युला वन चॅम्पियन असलेल्या मायकल शूमाकरने सचिनला फेरारी मोडेना ३६० गिफ्ट केलेली. २००३ मध्ये १ कोटी ३० लाखाचा टॅक्स भारत सरकारने सचिनला माफ केल्याने मोठा वाद निर्माण झालेला. अनेक वर्ष ही कार सचिनने वापरली. फेरारी की सवारी नावाचा सिनेमाही आला. मात्र, नंतर त्याने ही कार विकली. सध्या सचिनकडे बऱ्याच कार आहेत. मात्र, त्यापैकी सर्वात महागडी कार ठरते बीएमडब्ल्यू i8. हिची भारतात एक्स शोरूम किंमत आहे २ कोटी ७० लाख. यातील आणखी एक वैशिष्टपुर्ण गोष्ट म्हणजे सचिन हाच बीएमडब्ल्यूचा भारतातील ब्रँड ॲम्बेसिडर आहे.
टीम इंडियाच्या ऑल टाईम ग्रेट ओपनर्सपैकी एक असलेल्या वीरेंद्र सेहवागलाही गाड्यांचा भारी शौक. त्याच्या सर्वात महागड्या कारची जास्त चर्चा झाली नसली तरी, ती जगातील सर्वात ब्रॅंडेड कंपन्यांपैकी. बेंटली कॉन्टिनेन्टल फ्लाईंग स्पर नावाची ही कार तीन कोटी किमतीची आहे. सेहवाग अगदी खास मौक्यांवर ही कार चालवताना दिसतो.
आता आपण जाणून घेऊया सध्या भारतीय क्रिकेटची दिल आणि धडकन असलेल्या रोहित शर्मा व विराट कोहलीच्या महागड्या गाड्यांविषयी. धोनीप्रमाणे विराटही अशा लक्झरी कार्सचा मोठा चाहता आहे. ऑडी इंडियाचा ब्रँड ॲम्बेसिडर असलेल्या विराटच्या पार्किंगमध्ये ऑडी Q7, ऑडी Q8, बेंटली स्पर, लॅंड रोवर अशा एकाहून एक कार्स आहेत. मात्र त्याची सर्वात महागडी कार आहे R8 V10 LMX. हिची किंमत तीन कोटींपेक्षा जास्त सांगितली जाते. विराटप्रमाणे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्याकडे देखील अनेक कार्स दिसून येतात. अगदी त्याने पहिल्यांदा घेतलेली स्कोडा लॉरा अजूनही त्याच्या गॅरेजमध्ये आहे. मर्सडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी यांच्या कोट्यवधींच्या किमतीच्या लक्झरी कार्स त्याच्याकडे आहेत. मात्र, त्याच्याकडील सर्वात महाग कार आहे लेम्बोर्गिनी उरूस. तीन कोटी १० लाखांची ही कार भारतात इतर कोणीही वापरत नाही.
टीम इंडियाचा दोन वर्ल्डकप विजयांचा नायक युवराज सिंग हादेखील महागड्या स्पोर्ट्स कार वापरतो. BMW X6M, BMW M3, BMW M5 E60, ऑडी Q5, बेंटली या एक से बढकर एक कार्स त्याच्या गॅरेजमध्ये लावलेल्या असतात. मात्र, त्याची आवडती कार आहे लेम्बोर्गिनी म्युर्सिलार्गो. स्पोर्ट्स कार श्रेणीतील ही कार तीन कोटींमध्ये त्याने खरेदी केली होती.
हे झाले टीम इंडियाचे सुपस्टार आणि लिजेंड. मात्र, आपले यंगस्टरही या शौकमध्ये आणि यादीत मागे नाहीत. हार्दिक पंड्या याने युवराज आणि रोहितच्या पावलावर पाऊल टाकत लेम्बोर्गिनीची हरकेन एवो ही पावणेचार कोटींची स्पोर्ट्स कार खरेदी केली. त्याच्याकडे आधीच रेंज रोवर आणि मर्सडीज AMG G63 या लक्झरी कार आहेत. हार्दिकचाच खास मित्र असलेल्या केएल राहुलकडे कोटीच्या घरात किंमत असलेल्या चार कार आहेत. मात्र त्याची सर्वात महागडी कार लेम्बोर्गिनी हरकेन एवो स्पायडर ही ४ कोटी १० लाख इतक्या किमतीची आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकापूर्वी आयसीसीने शेअर केला पंतचा खासम खास व्हिडिओ, कॅप्शनही आहे दमदार
उमरानच्या गतीला तोडच नाही..! इंग्लंडमध्येही फेकला भारताकडून सर्वात वेगवान चेंडू, स्पीड तर पाहा
जगातील अव्वल दर्जाच्या क्रिकेटर्सशी भिडणार भारतीय खेळाडू, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी रंगणार थरार






