कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल)च्या ८ हंगामाचा अंतिम सामना उद्या (१० सप्टेंबर) त्रिनबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध सेंट लूसिया ज्यूक्स संघात होणार आहे. हा सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळण्यात येईल. Caribbean Premier League Final Match Between TKR Vs SLZ
डॅरेन सॅमीच्या नेतृत्त्वाखालील सेंट लूसिया संघाला पहिल्यांदा सीपीएलचे विजेतेपद पटकावण्याची संधी मिळाली आहे. तर, कायरन पोलार्डच्या नेतृत्त्वाखालील नाईट रायडर्स संघ तिसऱ्यांदा विजेता ठरू शकतो. यापुर्वी त्यांनी २०१७ आणि २०१८मध्ये सीपीएल ट्रॉफी जिंकली होती.
आतापर्यंत सलग १० सामन्यांत विजेता ठरलेल्या नाईट रायडर्सने पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात जमैका तलावाहला ९ विकेट्सने पराभूत करत, अंतिम सामन्यात प्रवेश केला. ८ सप्टेंबरला पार पडलेल्या या सामन्यात नाईट रायडर्सने जमैका तलावाहला २० षटकात ७ विकेट्स गमावत केवळ १०७ धावाच करु दिल्या. यात, फिरकीपटू गोलंदाज अकिल हुसैनचे महत्त्वाचे योगदान राहिले. त्याने ४ षटकात केवळ १४ धावा देत ३ विकेट्स चटकावल्या.
त्यानंतर नाईट रायडर्सने जमैका तलावाहच्या आव्हानाचा पाठलाग करताना १५ षटकातच १ विकेट गमावत १११ धावा केल्या आणि सहज ९ विकेट्सने तो सामना जिंकला. यामध्ये लेंडल सिमन्सच्या नाबाद ५४ धावा आणि टायन वेबस्टरच्या नाबाद ४४ धावांचा समावेश होता. या सामन्यासह नाईट रायडर्सने सीपीएलच्या ८व्या हंगामात सलग ११वा सामना जिंकला.
तर, ८ सप्टेंबरलाच पार पडलेल्या दूसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात सेंट लूसिया ज्यूक्सने गयाना अमेझॉन वॉरियर्सला १० विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अमेझॉन वॉरियर्स केवळ १३.४ षटकात ५५ धावांवर सर्वबाद झाला. यात सेंट लूसियाच्या फिरकीपटू मार्क डेयलच्या १ षटकात २ धावा देत २ विकेट्सच्या कामगिरीचा समावेश होता.
ही सीपीएल इतिहासातील दूसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापुर्वी सर्वात कमी धावसंख्या करण्याचा नकोसा विक्रम रेड स्टील संघाने केला होता. २०१३साली ट्रायडेंट्स संघाने त्यांना केवळ १२.५ षटकात ५२ धावांवर सर्वबाद केले होते. त्यांचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दोन मोठ्या पदांवर नेमणूक झाल्यामुळे ‘या’ दिग्गजावर कडाडून टीका
यंदा ‘ही’ धावसंख्या आयपीएलमध्ये ठरणार आव्हानात्मक; या दिग्गजाचा दावा
इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व
ट्रेंडिंग लेख –
३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध
रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे
तमिळनाडूचा मेकॅनिकल इंजिनीयर आयपीएलमध्ये करोडपती होतो तेव्हा…