---Advertisement---

आनंदाची बातमी! १८ ऑगस्टपासून सुरू होणार ही लीग, भारतीय खेळाडूही होणार सहभागी

On: रविवार, जुलै 12, 2020 8:10 AM
---Advertisement---

मुंबई । संपूर्ण जगाला कोरोना या महाभयानक विषाणूने घेरले आहे. दरम्यान, या महामारीच्या सावटातच इंग्लंडमध्ये क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरू सुरुवात झाली आहे. यातच टी 20 लीगला देखील सुरुवात होणार आहे. 18 ऑगस्टपासून कॅरेबियन प्रिमियर लीग 2020 (सीपीएलला) सुरुवात होणार आहे.

कोरोना व्हायरस नंतर सीपीएल जगातली पहिली फ्रेंचायजी टी 20 लीग आहे, जी सर्वात आधी पुनरागमन करत आहे.  34 दिवस चालणाऱ्या या लीगमधील अंतिम सामना 10 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही संपूर्ण लीग यंदाच्या वर्षी त्रिनिदाद अँड टोबॅगो मध्ये खेळली जाणार आहे. खेळाडूंची कोरोना या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन आणि सरकारकडून ही लीग भरवण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.

या लीगमध्ये सहभागी होणारे संघातील सर्व खेळाडू आणि अधिकारी त्रिनिदाद अँड टोबॅगो येथे येतील आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये दोन आठवड्यांसाठी आयसोलेशनमध्ये राहतील. विदेशातून येणाऱ्या खेळाडू आधी त्रिनिदाद एण्ड टोबॅगो येथे येतील. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट होईल.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही लीग यंदा प्रेक्षकांविना खेळवली जाणार आहे. कोव्हिड 19 च्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्यात येणार आहे. या लीगमध्ये आयसीसीने सांगितलेल्या नियमांचेदेखील पालन केले जाणार आहे. आयसीसीच्या नव्या नियमानुसार चेंडूला लाळ लावता येणार नाही. या लीगमध्ये देखील हा नियम लागू असणार आहे. यंदाच्या सीपीएलमध्ये ख्रिस गेलचा धमाका पाहता येणार नाही. कारण त्याने यापूर्वी या लीगमध्ये खेळण्यास नकार दिला आहे.

निवृत्ती घेतलेले काही भारतीय क्रिकेटरही यात खेळताना दिसण्याची चिन्ह आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---