---Advertisement---

जोकोविच कारकिर्दीतील 11वे तर अल्काराझ पहिले ऑस्ट्रेलिया ओपन जिंकण्यास आतूर! विरोधात कोणी मारली बाजी? वाचा सविस्तर

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 8:55 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत आज (१ फेब्रुवारी) सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनचा कार्लोस अल्काराज एकमेंकासमोर येणार आहेत. जोकोविचने उपांत्य फेरीत इटलीच्या यानिक सिन्नरला ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली, तर अल्काराजने जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेव्हला ६-४, ७-६ (५), ६-७ (३), ६-७ (४), ७-५ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे जोकोविच की अल्काराझ कोण ठरणार यंदाच्या ऑस्ट्रेलिया ओपनचा विजेता यात चुरस असणार असून दोघांची एकमेंकाविरोधातील कामगिरी पाहू.

जोकोविच आणि अल्काराज २०२४ विम्बल्डननंतर प्रथमच ग्रॅंड स्लॅम्सच्या अंतिम फेरीत समोरा-समोर आले आहेत. हे दोघे आतापर्यंत एकूण ९ वेळा समोरा-समोर आले आहेत. त्यामध्ये जोकोविच ५ विजय मिळवत आघाडीवर असून अल्काराजने त्याच्याविरुद्ध ४ वेळा विजय मिळवला आहे.

जोकोविच कारकिर्दीतील २५वे ग्रॅंड स्लॅम्स आणि ११वे ऑस्ट्रेलिया ओपनचे विजितेपद जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. दुसरीकडे अल्काराज कारकीर्दीतील सातवे आणि पहिलेच ऑस्ट्रेलिया ओपन जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तो पुरूषांच्या एकेरीत फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि युएस ओपन या ग्रॅंड स्लॅम्समध्ये प्रत्येकी दोन वेळा चॅम्पियन ठरला आहे. तसेच स्पेनसाठी चारही ग्रॅंड स्लॅम्स जिंकण्याची कामगिरी करण्याची त्याच्याकडे संधी आहे. याआधी स्पेनकडून राफेल नदालने अशी कामगिरी केली आहे.

अंतिम फेरीची कामगिरी पाहिली तर जोकोविच-अल्काराझ हे दोघे पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये अंतिम फेरीत भिडले होते. त्यामध्ये जोकोविचने बाजी मारत सुवर्णपदक जिंकले होते. २०२४ आणि २०२३ या दोन्ही विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मात्र अल्काराझने जोकोविचला पराभूत केले होते.

हे दोघे शेवटी २०२५च्या युएस ओपनच्या उपांत्य फेरीत समोरा-समोर आले होते. त्यामध्ये अल्काराझ जिंकला होता. तसेच ऑस्ट्रेलिया ओपन २०२५मध्येही जोकाविच – अल्काराझ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला होता. त्यामध्ये जोकोविच जिंकला होता.

नोकोविच- अल्काराझ २०२२मध्ये कारकिर्दीत पहिल्यांदा समोरा-समोर आले होते. एटीपी मास्टर्स १०००च्या त्या उपांत्य फेरीत अल्काराझ जिंकला होता. २०२३च्या फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोविच वरचढ ठरला. तसेच २०२३च्या एटीपी मास्टर्स १००० सिनसिनाटीच्या अंतिम फेरी आणि निट्टो एटीपी फायनल्स स्पर्धेच्या उपांत्य फेरी या दोन्हीमध्ये जोकोविचने अल्काराझला पराभूत केले होते.

ताज्या जागतिक क्रमवारीनुसार अल्काराज अव्वल असून जोकोविच चौथ्या स्थानावर आहे. सिन्नर आणि अल्काराझने मागील दोन वर्षे चारही ग्रॅंड स्लॅम्समध्ये आपापले वर्चस्व ठेवले होते. आता जोकविचने पुन्हा अंतिम फेरीत प्रवेश केला असून अल्काराझ त्याला थांबवेल की नाही याकडे टेनिस चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---