---Advertisement---

Video: सहा वर्षांपूर्वी जगातील एकाही संघाला न जमलेला कारनामा विंडीजने केला होता

---Advertisement---

सहा वर्षांपूर्वी ३ एप्रिल २०१६ ला वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्यांदा पुरुष टी२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यांनी इडन गार्डन, कोलकाता येथे इंग्लंड विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवत हा पराक्रम केला होता. त्याआधी त्यांनी २०१२ ला टी२० विश्वचषक जिंकला होता. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रेथवेटने शेवटच्या षटकात सगल ४ षटकार मारत हे विजेतेपद वेस्ट इंडिजला मिळवून दिले होते.

त्यावेळी २ वेळा टी२० विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिज पहिलाच संघ ठरला होता. त्याआधी कोणत्याही संघाला २ वेळा टी२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवता आले नव्हते.

असा झाला होता सामना
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. इंग्लंडकडून जेसन रॉय आणि ऍलेक्स हेल्स हे दोघे सलामीला फलंदाजीसाठी उतरले. मात्र हे दोघांनी पहिल्या २ षटकांच्या आतच विकेट्स गमावल्या. त्यानंतर काहीवेळातच कर्णधार ओएन मॉर्गनही बाद झाला.

पण त्यानंतर जो रुट आणि जॉस बटलरने चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सावरले. मात्र कार्लोस ब्रेथवेटने बटलरला ३६ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यापाठोपाठ इंग्लंडने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.

पण जो रुटने ३६ चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली लढत दिली होती. तसेच डेव्हिड विलीने देखील १४ चेंडूत २१ धावा करत चांगले योगदान दिले. त्यामुळे इंग्लंडने २० षटकात ९ बाद १५५ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला १५६ धावांचे आव्हान दिले.

वेस्ट इंडिजकडून ड्वेन ब्राओ आणि कार्लोस ब्रेथवेटने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर सॅम्यूएल्स बद्रीने २ आणि आंद्रे रसलने १ विकेट घेतली.

त्यानंतर १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिजचीही सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिल्या ३ षटकात ३ विकेट्स गमावल्या. पण मार्लन सॅम्युएल्सने ड्वेन ब्रावोला साथीला घेत वेस्ट इंडिजला सावरले. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली.

मात्र ब्रावो २५ धावांवर, आंद्रे रसल १ धावेवर आणि कर्णधार डॅरेन सॅमी २ धावांवर लागोपाठ बाद झाले. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ संकटात सापडला. पण यानंतर ब्रेथवेटने सॅम्युएल्सला भक्कम साथ दिली.

शेवटच्या षटकात वेस्ट इंंडिजला १९ धावांची गरज होती. त्यावेळी ब्रेथवेट फलंदाजी करत होता. तर मॉर्गनने हे षटक टाकण्यासाठी बेन स्टोक्सकडे चेंडू सोपवला. त्यावेळी ब्रेथवेटने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार खेचला.

त्याच्या पुढच्या दोन्ही चेंडूंवरही ब्रेथवेटने खणखणीत षटकार मारत सामना वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकवला. त्यामुळे शेवटच्या ३ चेंडूंवर वेस्ट इंडिजला केवळ १ धावेची गरज होती. त्यावेळी ब्रेथवेटने चौथ्या चेंडूवरही षटकार मारत वेस्ट इंडिजला विजेतेपद मिळवून दिले.

ब्रेथवेटने १० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या होत्या. तर सॅम्युएल्सने ६६ चेंडूत ८५ धावांची खेळी केली होती. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने ३ विकेट्स, जो रुटने २ विकेट्स आणि आदील राशिदने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

जेव्हा २५ वर्षांपूर्वी संघातील सर्व खेळाडूंना मिळाला होता सामनावीराचा पुरस्कार

कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवणारा मुंबईकर ‘निलेश कुलकर्णी’

Video: भारताच्या त्रिशतकवीराने तोडले चहलचे हॅट्रिकचे स्वप्न, पण फिरकीपटूने दाखवली खिलाडूवृत्ती

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---