आजकाल खेळाडू अनेकदा त्यांच्या मैदानातील कामगिरीबरोबरच मैदाबाहेरील गोष्टींमुळेही चर्चेत येत असतात. यात जाहीरातींचाही मोठा वाटा असतो. पण आता अशा गोष्टी रशियाची महिला टेनिस स्टार मारिया शारापोव्हा आणि सात वेळचा फॉर्म्यूला वन विजेता मायकल शुमाकर यांना महागात पडताना दिसत आहे. त्यांच्यावर गुडगाव पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे, त्यांच्यासह इतर ११ जणांवर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचण्याप्रकरणी तक्रार दाखल झाली आहे.
तसेच गुडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एफआयआरमध्ये नाव असलेल्या आरोपींमध्ये रिअल इस्टेट प्रकल्पाचे संचालक आणि इतर डेव्हलपर्सचा समावेश आहे. ही तक्रार दिल्लीतील शेफाली अग्रवाल यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी त्यांच्या पतीसह ३६५० स्केअर फुटचे अपार्टमेंट सेक्टर ७३ मधील शारापोव्हाच्या (Maria Sharapova) नावाच्या प्रोजेक्टमध्ये बूक केले होते.
या तक्रारीमध्ये शेफाली यांनी असा आरोप केला आहे की, फर्मच्या संचालकांनी अपार्टमेंटसाठी प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली. त्यांच्या तक्रारीमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही प्रकल्पाचे फोटो पाहून कंपनीच्या व्यवस्थापनाला भेटलो. त्यावेळी कंपनीकडून अनेक खोटी आश्वासने देण्यात आली.’ तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शारापोव्हा या प्रकल्पात टेनिस अकादमीही उघडणार होती, तसेच ती या प्रकल्पाची जाहीरात करत होती.
या प्रकल्पातील एका टॉवरचे नाव शुमाकरच्या (Michael Schumacher) नावावरूनही ठेवण्यात आले होते. हा गृहप्रकल्प २०१६ मध्ये पूर्ण होणार होता. मात्र, असे झाले नाही. तसेच माध्यमांतील वृत्तानुसार हे प्रकरण एमएस रियलटेक डेवलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायवेट लिमिटेशी जोडलेले आहे. यात शारापोव्हा आणि शुमाकर यांच्यावर जवळपास ८० लाख रुपयांच्या फसवणूकीचा आरोप आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय, पहिल्यांदाच वनडे विश्वचषकात चारली धूळ
जुन्नरचा कौशल तांबे दिल्ली कॅपिटल्स संघासाठी निभावणार महत्त्वाची जबाबदारी
‘बेबीसिटर’ पंत! संघ-सहकाऱ्याच्या मुलासोबत खेळताना दिसला टोपीचा अनोखा खेळ, पाहा क्यूट व्हिडिओ