भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना बीसीसीआयचे अध्यक्ष पद सोडावे लागले होते. त्यांच्या जागी भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची वर्णी लागली. गांगुली यांनी हे पद सोडले तेव्हा अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. काहींनी यामध्ये राजकारण केले जात असल्याचा आरोप लावला होता. तर, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संपूर्ण प्रक्रियेत लक्ष घालण्याचे आवाहन केलेले. त्यानंतर आता गांगुली यांना बीसीसीआय अध्यक्षपदावरून कशा पद्धतीने हटवले? याबाबत विचारणा करणारी जनहित याचिका दाखल केली गेली आहे.
गांगुली यांनी आपला पदभार सोडल्यानंतर जवळपास एक महिनाभराने कोलकाता उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली गेली. वकील रामप्रसाद सरकार यांनी ही याचिका दाखल केली. आता हे प्रकरण सरन्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव व राजश्री भारद्वाज यांच्या खंडपीठासमोर जाईल व त्यानंतर यावर सुनावणी होईल.
सरकार यांनी ही याचिका दाखल करताना म्हटले आहे की,
“सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, गांगुली यांना आणखी तीन वर्ष आपले पद भूषवता आले असते. जर गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव पदावर कायम राहू शकतात तर, गांगुली का नाही? राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण घडले आहे का?”
असा सवाल सरकार यांनी केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील गांगुली यांना पदावरून हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केलेली. मात्र, त्यानंतरही गांगुली यांना आपले पद सोडावे लागले. आता गांगुली हे पुन्हा एकदा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराट सूर्या अन् डिविलियर्ससारखे फँसी शॉट्स का खेळत नाही? कारण समजताच तुम्हीही व्हाल कोहलीचे फॅन
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय