---Advertisement---

पहा व्हिडिओ- मांजरीने घातला चालु सामन्यातच धुमाकूळ

On: शनिवार, मे 19, 2018 5:11 PM
---Advertisement---

रोममध्ये सुरू असलेल्या इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या सामन्यात एका अनपेक्षित पाहुण्याने थेट कोर्टवर हजेरी लावली होती.

लुकाझ कुबोट – मार्सेलो मेलो विरुद्ध जुआन सेबास्टियन – रॉबर्ट फरहा यांच्यात झालेल्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपुर्व लढतीत एक मांजर थेट कोर्टवर पळत आले. 

यामुळे काही क्षण सामन्यामध्ये अडथळा निर्माण झाला होता. मात्र या मांजराने खेळाडुंसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. याचा व्हि़डिओ टेनिस टिव्हीने शेअर केला आहे. 

इटालियन ओपन स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने सामने रंगणार आहेत. त्यात राफेल नदाल विरुद्ध नोव्हाक जोकोविच यांच्यात होणाऱ्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल.

तसेच  पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीची दुसरी लढत मारीन चिलीच विरुद्ध अॅलेकझेंडर झ्वेरेव यांच्यात होईल.

याबरोबरच आज एलीना स्वेतोलीना विरुद्ध कोंतावेत आणि सिमोना हॅलेप विरुद्ध मारिया शारापोव्हा यांच्यात महिला एकेरीची उपांत्य फेरी रंगेल. 

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या स्फोटात ८ जण ठार

-म्हणून आजच्या दोन्ही आयपीएल सामन्यांना आहे महत्त्व!

या दोन संघांना आयपीएलमध्ये पडले आहेत षटकारांचे सर्वाधिक फटके

मुंबई नाही तर या दोन संघांनी आयपीएलमध्ये केली आहे षटकारांची बरसात

धोनी-कोहलीबद्दल झाला आयपीएलमध्ये विलक्षण योगायोग…!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment