नवी दिल्ली। ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी नुकताच आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, जो जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना आश्चर्य वाटत आहे. या व्हिडिओत एका मांजरीच्या शानदार क्षेत्ररक्षण कौशल्याचे दर्शन घडत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक मजेत मांजरीला क्रिकेटचा पुढील सुपरस्टार म्हणत आहेत.
क्रिकेटपटूनंतर समालोचक बनलेल्या जोन्स यांनी लिहिले, “मी जगातील सर्वात खराब क्षेत्ररक्षक पाहिले आहेत. मी तुम्हाला खात्री देऊ शकतो.”
https://twitter.com/ProfDeano/status/1290775397039083522
या व्हिडिओत एक महिला गोल्फ क्लबने चेंडू मांजरीच्या दिशेने मारत आहे. मांजरीच्या मागे एक छोटासा नेटही आहे. मांजर प्रत्येक चेंडू शानदार पद्धतीने पकडत आहे. समालोचक हर्षा भोगलेदेखील मांजरीच्या या करामतीने प्रभावित झाले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लिहिले की, “तो दुसरा झेल…”
https://twitter.com/bhogleharsha/status/1290893412120424448
हा व्हिडिओ आतापर्यंत १.५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. जवळपास ७ हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे, तर १२०० पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ रिट्वीट केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना काळात क्रिकेटचे आयोजन करणाऱ्या इंग्लंडचे होतेय कोटींचे नुकसान; बोर्ड घेणार मोठा निर्णय
६ वर्षांपासून आयपीएलमध्ये न खेळणाऱ्या पुजाराच्या नावावर आहे हा मोठा विक्रम; विराट- रोहितही आहेत मागे
दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: हे ५ फलंदाजांच्या बॅटमधून यंदा होऊ शकते षटकारांची बरसात
आयपीएल २०२० मध्ये ह्या ५ अष्टपैलू खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज