विराट कोहलीची आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजीत घसरण झाली आहे. तो गेल्या ६ वर्षांत पहिल्यांदाच टॉप १०मधून बाहेर गेला आहे. इंग्लंडविरुद्ध विराटने पहिल्या डावात ११ तर दुसऱ्या डावात २० धावा केल्या होत्या.
यामुळे विराट सध्या कसोटी क्रमवारीत १३व्या स्थानी फेकला गेला आहे. दुसरीकडे रिषभ पंत ५व्या स्थानी पोहचला आहे. त्याला एकप्रकारे त्याच्या शतकी खेळीची ही भेट आहे. रोहित शर्मा ९व्या स्थानावर कायम आहे.
(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या mahasports.in)