भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेंस (सीडीएस) बिपिन रावत ( Bipin Rawat ) यांच्यासह इतर १४ व्यक्तींचे हेलिकॉक्टर क्रॅशमध्ये निधन झाले. ही घटना तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये घडली. लष्कराचे हे हेलिकॉप्टर रावत यांच्यासह इतर सहकऱ्यांना घेऊन हवेत उडाल्यानंतर तत्काळ ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेवेळी रावत यांच्या पत्नीदेखील त्यांच्यासोबत होत्या आणि त्यांचेही निधन झाले आहे. दुर्घटनाग्रस्त व्यक्तींपैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी या गोष्टीची माहिती दिली.
घटनाग्रस्त व्यक्तींपैकी फक्त एकटे कॅप्टन वरुण सिंग यांचा जीव वाचला आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे. दुर्घटनेत स्वतः जनरल रावत, त्यांची पत्नी, त्यांचे सुरक्षा सहायक, सुरक्षा कमांडो आणि वायू लष्कराचे जवान यांचा समावेश आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्यासोबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेनंतर सर्वच क्षेत्रतील व्यक्तींनी त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण केली आहे. क्रिकेटविश्वातील देखील अनेक दिग्गजांनी रावत यांच्याविषयी शोक व्यक्त केला आहे.
https://twitter.com/imVkohli/status/1468574791317688323?t=a-EUk_dKvQOmBpCnMu8uOw&s=19
रावत यांना श्रद्धांजली देणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण, सुरेश रैना, प्रज्ञान ओझा, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग यांच्यासह इतरही दिग्गजांचा समावेश आहे. घटनेनंतर लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दौरा केला आहे. तसेच रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनीही रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सांत्वन भेट दिली.
https://twitter.com/VVSLaxman281/status/1468564338143162368?t=UqsQ_QDReE0eU15pUT4nxw&s=19
भारतीय वायू सेनेने या घटनेबाबात ट्वीट करून माहिती दिली. ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह आईएएफ एमआई-१७ वी५ हेलीकॉप्टर आज तमिळनाडूच्या कुन्नूरजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. दुर्घटनेच्या कारणांचा तपास लावण्यासाठी, चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.’
https://twitter.com/ImRaina/status/1468593035264991237?t=N_jiBrMhSIm784b2XYi_tw&s=19
मिळालेल्या माहितीनुसार, रावत त्यांच्या पत्नीसह वेलिंग्टनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. वेलिंग्टनमध्ये सशस्त्र दलाचे विद्यालय आहे आणि याठिकाणी रावत यांचे व्याख्यान आयोजित केले गेलेले. कार्यक्रमानंतर ते कुन्नूरला पुन्हा निघाले होते आणि त्याठिकाणाहून त्यांना दिल्लीसाठी रवाना व्हायचे होते. मात्र, अशातच घनदाट जंगलाच्यामध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ही दुर्घटना खराब हवामानामुळे झाल्याचे देखील सांगितले जात आहे.