---Advertisement---

रिस्क है तो…! अश्विनच्या हॅट्रिकच्या चेंडूवर त्रिपाठीचा निर्भीड षटकार, बघा डोळ्यांचे पारणे फेडणारा व्हिडिओ

On: गुरूवार, ऑक्टोबर 14, 2021 1:19 PM
---Advertisement---

शारजाहच्या मैदानावर बुधवारी (१३ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ स्पर्धेतील क्वालिफायरचा दुसरा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत माहीत नव्हते की, कोणता संघ विजय मिळवून अंतिम फेरीत दाखल होईल. शेवटी राहुल त्रिपाठीने आर अश्विनच्या चेंडूवर षटकार खेचला आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडूंनी जल्लोष साजरा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि २ षटकार मारले होते. तर श्रेयस अय्यरने नाबाद ३० धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला होता. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ५ बाद १३५ धावा करण्यात यश आले होते.

राहुल त्रिपाठीचा क्लासिक षटकार
प्रत्युत्तरात सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. त्यांनतर दिल्ली कॅपिटल्स संघातील गोलंदाजांनी देखील अप्रतिम गोलंदाजी करत कोलकाता नाईट रायडर्स संघातील फलंदाजांना बॅकफूटवर टाकले होते. शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. दरम्यान आर अश्विनने सुरुवातीच्या ४ चेंडुंमध्ये १ धाव खर्च करत २ गडी बाद केले होते. त्याने २० व्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेतली होती.

त्यानंतर पाचव्या चेंडूवर अश्विनला हॅट्रिकची संधी होती. तर कोलकाताला विजयासाठी २ चेंडुंमध्ये ६ धावांची आवश्यकता होती. या धाकदूक वाढवणाऱ्या प्रसंगी राहुल त्रिपाठीने पाचव्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता.

केकेआरच्या ताफ्यात जल्लोषाचे वातावरण
राहुल त्रिपाठीने षटकार मारल्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या ताफ्यात जल्लोषाचे वातावरण पसरले होते. हा षटकार पाहून राहुल त्रिपाठीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या डगआऊट आणि ड्रेसिंग रूममध्ये खेळाडू उत्साहात नाचताना दिसून आले होते. यासह स्टेडियममध्ये उपस्थित चाहते देखील उत्साह साजरा करताना दिसून आले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हे फक्त रिषभच करू शकतो! लाईव्ह सामन्यात पंतने चक्क अंपायरसोबत खेळला लपंडाव, तुम्हीही पाहा

ज्याची भीती होती तेच झाले; दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्याच ९ वर्षांपूर्वीच्या नकोशा कामगिरीची केली पुनरावृत्ती

हताश..निराश..नाराज! रबाडाने दांडी गुल करताच चिडला दिनेश कार्तिक, हाताने उडवला स्टंप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---